Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Maharashtra मराठा आरक्षण प्रश्नि छ उदयनराजे यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

मराठा आरक्षण प्रश्नि छ उदयनराजे यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

1630
Adv

काल दिल्लीमध्ये सर्वपक्षीय खासदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. त्याच पार्श्वभूमीवर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांची भेट आज भेटी घेतली व आरक्षण प्रश्‍नी विस्तृत चर्चा केली

महाराष्ट्रातील आरक्षण परिस्थिती वर यावेळी चर्चा करण्यात आली असून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भुमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रातील मराठा समाजाने देशासाठी बलिदान दिले आहे. सर्व समाजातील समाज घटकांना बरोबर घेऊन जाणार म्हणून ओळखला जाणारा हा समाज आहे. परंतु आता समाजातील मुला मुलींची व कुटुंब ची अर्थिक परिस्थिती भयावह झाली आहे. समाजातील मुला मुलींना शिक्षणासाठी फी भरणे आवघड झाले आहे. पालकांना जमीन विकुन व बँक व खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत आहे. तर शिक्षण झाल्यानंतर नोकरी ची शाश्वती नाही त्यामुळे कुटुंब ची परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी विनंती केली. तसेच महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जाती मध्ये आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी हा समाज अनेक वर्ष झटत आहे. इतर राज्य मध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळाले आहे.

परंतु महाराष्ट्रराज्यात शब्दांची आदल बदल झाली आहे. महाराष्ट्रत धनगड शब्द नसल्याने आरक्षण मिळत नाही तरी याबाबत आपण लक्ष घालावे व धनगर समाजाला आरक्षण दयावे हि विनंती केली यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही विषयावर सकारात्मक विचार केला जाईल व लवकरच तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले.

Adv