पाण्यापासुन वंचित असणा-यांना बोचणा-या आणि आम्हालाही टोचणा-या वेदना उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजींशीदूरध्वनीवरुन संवाद साधताना,नुकत्याच बोलून दाखवल्या होत्या. त्याचीच परिणीती म्हणून कृष्णा प्रकल्पाच्या सातारा जिल्हयातील पाण्याचे फेर नियोजन करण्याचा शासन निर्णय आजच झाला.या निर्णयामुळे लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजनेस तसेच बोंडारवाडी धरण प्रकल्पासाठी पाणी वापरता येणार आहे. हे मिळवलेले मोठे यश आम्ही प्रकल्पग्रस्तांसह जिल्हावासियांना समर्पित करतो अशी भावनिक प्रतिक्रीया खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे
भोसले यांनी व्यक्त केली आहे.सुमारे 11 पेक्षा जास्त धरणे असलेल्या सातारा जिल्हयातील जिल्हावासियांसाठी पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्यासाठी उपोषणासारख्या हत्यारांचा वापर करावा लागतो हे पाहुन मनाला असहय वेदना होतात असे नमुद करुन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की,जावली तालुक्यातील बोंडारवाडी धरणामधुन एकूण 54 गावांच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यासाठी गेल्या काही वर्षापासून आम्ही प्रयत्नशील आहोत. याकामी तत्कालीन मुख्यमंत्री ना.फडणवी आणिजलसंपदा मंत्री ना. गिरिष महाजन यांचेसमवेत सन 2016 ते 2018 पर्यात तीन चार वेळा बैठका झाल्या होत्या. याकामीसर्वेक्षण बोअरिंग कामास निधी उपलब्ध होवून,शुभारंभ देखिल झाला होता. याकरीता आम्ही आमच्या मालकीची जमीनदेखिल संपादनासाठी देत आहोत. बोंडारवाडी प्रकल्प कृष्णा खोरे लवादात अडकू नये म्हणून पिण्याच्या पाण्यासाठीधरणाला तत्वत: मान्यता देण्यात आली. पिण्याच्या पाण्यासाठी धरण बांधावयाचे तर ते जलसिंचन विभागाऐवजीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काम पूर्ण करणे आवश्यक आहे. यापूर्वी 02.02.2019 रोजी शासनाने 0.202 अ.घ.फु.इतक्या पाणी वापरास सहमती दर्शवली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास काही मर्यादा येत होत्या. त्यामुळेबोंडारवाडी धरण कृष्णासिंचन योजनेमधुनच पूर्ण करण्यात यावा अशी आमची मागणी होती. त्यासाठी पाणी वापराचे
फेरसुधारित नियोजन करणे गरजेचे होते. यामध्ये बराच कालावधी व्यपगत होत होता.
दरम्यान, लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळण्यासाठी वेटणे- नरसिंगवाडी येथील आमरण
उपोषणास बसलेल्या व्यक्तींची वेदना जाणण्यासाठी आम्ही गेलो. त्यांच्या वेदना ऐकून मन विषण्ण झाले. धरणांच्या
जिल्हयात अशी फरफट सहन होणारी नव्हती. तेथुनच आम्ही उप मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनीवरुन व्यथा
कळवल्या. देवेंद्रजी हे निश्चितच संवेदनशील मनाचा नेता म्हणून सर्वदूर ओळखले जातात याची प्रचिती आली. त्यांनी
तातडीने कृष्णा सिंचनाचे सुधारित फेर पाणीवाटप मंजूर करुन तसा शासन निर्णय आजच निर्गमित केला आहे. या
निर्णयानुसार कृष्णा सिंचन प्रकल्पाचे सुधारित पाणी वापर पूर्वी इतकाच म्हणजे 32.085 अ.घ.फु. राहणार आहे. पैकी
सिंचनासाठी सिंचनासाठी 30.13,, पिण्यासाठी 1.538 तर औद्योगिकवापरासाठी 0.417 अ.घ.फु. असे फेरनियोजन केले
आहे. जिहे कटापूर करीता 5.742,, बोंडारवाडीसाठी 0.798, अ.घ्.फु. पाणी वापरता येणार आहे. आता या फेरनियोजनानुसार कृष्णा खोरे महामंडळाने पुढील कार्यवाही करण्याची आहे.ना. देवेंद्र फडणवीस यांचेशी आमची मैत्री असली तरी सुध्दा समाजाचा कळवळा त्यांना आहे म्हणूनच इतक्या झटपट निर्णय त्यांनी घेतला. त्यांची आजपर्यंतची कार्यशैली बिनतोड आहे. त्यामुळेच जिहे कटापूर सहीत बोंडारवाडीच्या धरणाची, नरसिंगवाडी-वेटणे येथील पाण्याची कोंडी फेर पाणी वापर निश्चितीमुळे फुटली आहे. हे यश आमचे किंवा देवेंद्रजींचे नाही. आम्ही आमचे कर्तव्य बजावले आहे. हे यश निश्चितच प्रकल्पग्रस्तांचे आणि तमाम जिल्हा वासियांचे आहे. बोंडारवाडी धरणग्रस्तांना आम्ही कधीही अंतर देणार नाही या संपूर्ण प्रक्रीयेतील सर्व संबंधीतांचे आम्ही तमाम
जनतेच्या वतीने आभार व्यक्त करतो असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमुद केले आहे.