पायाभूत सुविधांपेक्षा विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणे गरजेचे खा उदयनराजे

337
Adv

आजचे विदयार्थी उदयाच्या राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत. पायाभुत सुविधांपेक्षाही मुलांना शिक्षण देणे हे अत्यंतमहत्वाचे व सर्वोच्य प्राधान्य देणेची बाब आहे. म्हणूनच शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी आणि पालकांचाही आर्थिक भार थोडा का होईना कमी होण्यासाठी, जिल्हयातील नगरपालिका शाळामधील सुमारे 12 हजार मुलांना सुमारे 45 हजार शालेय वहयांचे वाटप करण्यात आले आहे असे उद्गार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काढले.

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातुन 45 हजार शालेय वहयांचे वाटप जलमंदिर पॅलेस, सातारा येथे नगरपालिका शिक्षण मंडळातील जबाबदार व्यक्तींना करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हापरिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, विनित पाटील, माजी नगरसेवक बाळासाहेब राक्षे, विजय नायकवडी प्रमुख उपस्थित होते.

 

हल्ली शासनाने प्राथमिक शालेय विदयार्थ्यांच्या पुस्तकांचे ओझे कमी केले आहे. तथापि विदयार्थ्यांना एक विषया करीता एक वही तरी असणे आवश्यक आहे. तसेच आम्ही सामाजिक कार्य करीत असताना एक कौटुंबिक जबाबदारी म्हणूनही आम्ही कर्तव्य समजुन, वहयांचे वाटप जिल्हयातील नगरपालिकांच्या शाळेतील विदयार्थ्यांना करण्याचे धोरण गेल्या काही वर्षापासून आखले आहे. गतवर्षी देखिल वहयाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे एक जबाबदारी आणि कर्तव्य म्हणून वहया वाटप करताना एक वेगळेच समाधान वाटते असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले
यांनी म्हटले आहे.या कार्यक्रमास, जिल्हयातील सातारा, कराड, वाई, महाबळेश्वर, पांचगणी, फलटण या नगरपालिकांच्या शिक्षण मंडळांकडे विदयार्थी पट संख्येनुसार वहयां प्रदान करण्यात आल्या. याप्रसंगी सर्व शिक्षक व मुख्याध्यापक, उदयनराजे भोसले मित्रसमुहाचे सदस्य, पदाधिकारी आदी मोठया संख्येने उपस्थित होते.

Adv