किल्ल्यांवरील अतिक्रमण काढणारे सरकार शिवतीर्थ प्रकरणी गप्प

302
Adv

छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमण काढणारे सरकार साताऱ्यातील शिवतीर्थ परिसरात आयलँडरूपी अतिक्रमण करत असून नक्की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे चालले तरी काय असा प्रश्न साताऱ्यातील जनतेला पडलेला आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकारने प्रतापगड, विशाळगड या परिसरातील अतिक्रमण काढून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर सरकार चालवतो हे दाखवून दिले होते मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असून जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या सातारा शहरातील शिवतीर्थ या परिसरात आयलँड उभारण्याचा प्रस्ताव ठेवून एक प्रकारे अतिक्रमण करत असल्याचे दिसून येते मग हा दु टप्पेपणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा नाही का मतांसाठी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे व आपला पक्ष चालवायचा हा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांना पडलेला आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या परिसरातील अतिक्रमणे काढून आपली पाठ थोपटून घेतली होती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातच शिवतीर्थच्या समोर आयलँडरुपी अतिक्रमण होत असून यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गप्प असल्याचे दिसून येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील नागरिकांची जनभावना समजून घेऊन या आयलँडला परवानगी न देण्याच्या सूचना आपल्या जिल्हा प्रशासनाला कराव्यात अशी मागणी सातारा जिल्ह्यातील नागरिक करत आहेत

Adv