कोयता गॅंग घेऊन हशत पसरवणाऱ्यांना पोलीस पत्रा कधी ठोकणार ?

617
Adv

गुटका विक्री प्रकरणा पान टप-यावर शाहुपूरी पोलसानी जोरदार कारवाई केला आणि सुमारे 23 टपरीचालकांना अटक केल्याचे वृत्त समजले.परंतु त्याचबरोबरीने कोयता गँग,बकासुर गँग,अमका फाळकुट दादा इत्यादींच्या कोयते,तलवारी, देशी-विदेशी घोडयांमधुन फायरींग या घटनांमधुन, संपूर्ण समाजात दहशत पसरवणा-यांना जिल्हाप्रशासन आणि पोलिसप्रशासन कधी पत्रया ठोकणार आहे का नाही हा सामान्यजनतेमध्ये सवाल आहे असे नमुद करुन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कोयता-तलवार नाचवणे, वाटमारी, जबरी चोरी इ.दहशत फैलावणा-या घटनांचा पूर्ण बंदोबस्त करावा अशी जनतेची अपेक्षा आहे असे म्हटले आहे.

याविषयी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे की, गुटका हा प्रकार निश्चितच वाईट आहे. गुटका विक्रीवर राज्यात बंदी असल्याने, गुटक्याचे किंवा अन्य कोणत्याही व्यवसनाचे आणि व्यसनांधांचे आम्हीच काय कोणीही समर्थन करणार नाही.तथापि
गुटका खाल्याने किंवा विक्री केल्याने समाजामध्ये भीती किंवा दहशत निर्माण होत नाही हे ही तितकेच खरे आहे. शासन सुध्दा असे काही करते की,गुटका किंवा प्लॅस्टीक यांच्या उत्पादनावर बंदी नाही. परंतु विक्रीवर मात्र राज्यामध्ये बंदी अशी भुमिका घेत असते. जर गुटका वाईट आहे तर त्याच्या उत्पादनावरही बंदी घातली पाहीजे. तंबाखु खाणे दंडनीय अपराध ठरतो तर तंबाखु विक्री आणि उत्पादन किंवा बाळगणे
सुध्दा अपराध ठरला पाहीजे. पण तसे नाही ही वस्तुस्थिती आहे.काही राज्यांमध्ये गुटखा प्रचंड प्रमाणतउपलब्ध आहे हा आश्चर्यकारक विरोधाभास सामान्य जनतेला जाणवतो. सर्वच सामान्य जनतेला कायदेनियम याचे ज्ञान असतेच असे नाही. त्यामुळे साहजिकच लोकांची मानसिकता विचलित होते, तिकडे
मिळते मग इकडे का नाही अश्या संभ्रमात पडते आणि मग आपोआप बंदी असलेल्या पदार्थाची मागणी होते. मागणी आहे तर पुरवठा झाला पाहीजे असा सर्वसाधारण सिध्दांत आहे. त्यामुळे मग पानटपरीवाले काळया बाजारात असा माल विकत घेतात,आणि तो लपून छपून विकतात.प्रशासनाने टपरी चालकांना जेथुन माल येतो अश्या व्यापा-यांना पकडले पाहीजे. मालच मिळाला नाही तर पुढचा विषयच येणार नाही आणि टपरीचालक देखिल आहे त्या परिस्थितीत आपल्या गरजा आणखी कमी करुन,उदरनिर्वाह साधतील.परंतु असे होत नाही. पोलिसांची दादागिरी वचक दहशत माजवणा-यांवर असली पाहीजे परंतु ती गोरगरीबांवर असल्याचे ठळक होत आहे.

त्यामुळे समाजात दिवसाढवळया,रात्री-अपरात्री दहशत पसरवणा-यांचा आणि त्यांच्या सुत्रधारांचा बंदोबस्त प्रथम केला पाहीजे.कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून, समाजातील कोणालाही कधीही रस्त्याने जाता येता आले पाहीजे अश्या प्रकारची सुरक्षा पुरवली पाहीजे आणि मग छोटया व्याव सायिकांवर कायदयाने कारवाई केली पाहीजे.प्राधान्य सर्वोच्य प्राधान्य असे कारवाईचे क्रम असावेत असे सामान्य
जनतेचे म्हणणे आहे.

संगमनगर, कृष्णानगर,(शहर पोलिसस्टेशनच्या हददीचा भाग) शाहुपूरी, राजवाडा, मल्हारपेठ,बुधवारनाका, मोतीचौक्, बोगदा, या भागात अनेकवेळा एकटया दुकटयाला अडवून, वाटमारी-जबरी चोरी झाली आहे. रस्त्यावर धारदार शस्त्रे नाचवली गेली आहेत. गोळीबार देखील झाला आहे. अश्या अनपेक्षित प्रकारामुळे नागरीकांमध्ये अनामिक भीती निर्माण होत असते. शहराचीही बदनामी-नाचक्की होत असते.असे समाजविघातक प्रकार करणा-यांना पोलिसांनी वेळीच पत्रया ठोकल्या पाहीजेत. पोलिसांचे खबरे कार्यरत नाहीत काय? नसतील तर नव्याने खबरे तयार करावेत.लोकांमधुन पोलिस मित्र,पोलिस-ताई यासारखे उपक्रम प्रभावीपणेराबवावेत.तरुणांना रोजगार नाही, नोक-या नाहीत, त्यामुळे एखादया कुटुंबातील कर्ता-धर्ता पान टपरी,हातगाडी, ढकलगाडी इत्यादीवर छोटा मोठा व्यवसाय करुन गुजराण करण्याचा प्रयत्न करतो. अश्या
परिस्थितीत 23 टपरी चालकांवर अटक आणि कायदयाचा ससेमिरा लावणे हे कितपत योग्य आहे याचाविचार पोलिस प्रशासनाने टपरी चालकांच्या भुमिकेत शिरुन केला पाहीजे.

दहशतखोरांचा बंदोबस्त झाल्यावर, गुटका किंवा तत्सम पदार्थ विक्री करणा-यांवर थेट कारवाईकरण्याच्या उपक्रमाला अधिक चांगला अर्थ मिळेल.एकीकडे गुटका विकल्याबद्दल टपरीवाल्यांना अटक करायची आणि दुसरीकडे सरेआम दहशत माजवणा-या गुन्हेगारांना पायघडयासह मोकळीक म्हणजे मोरीला बोळा आणि दरवाजा उघडा असा प्रकार प्रशासनाकडून होत असल्याचे त्यांच्या कृतीमधुनच सिध्द होईल असा टोला देखिल पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लगावला आहे.विदयमान पोलिस अधिक्षक अत्यंत संयमी आहेत. त्यांनी कुठेही भडक भुमिका आजपर्यंत घेतलेली नाही, चांगल्या पध्दतीने पोलिस प्रशासन हाताळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनीशहरातील दादागिरी, गुंडगिरी, भाईगिरी संपुष्टात आणण्याचे आव्हान यशस्वी करावे.आवश्यकता वाटेलतेथे जनतेमधील खबरे घेवून, दहशत पसरवणा-यां गुन्हेगारांचा मुळासकट नायनाट करुन, बिमोड करावा अशी रास्त अपेक्षा भयभीत झालेल्या जनतेमधुन व्यक्त होत आहे.

Adv