सातारा जिल्ह्यामध्ये निसर्ग अत्यंत समृद्ध असून त्याचे पर्यावरण संतुलन राखणे अतिशय गरजेचे आहे. त्या पर्यावरणाच्या संतुलनासह साताऱ्यात पर्यटन व्यवसायाला उत्तेजन देण्याच्या दृष्टीने कास महाबळेश्वर पाचगणी या भागांच्या संदर्भात उपाययोजना केल्या जातील अशी स्पष्ट ग्वाही साताऱ्याचे नूतन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली
तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी जे जे चांगले उपक्रम जिल्ह्याच्या विकासासाठी राबवले त्या चांगल्या परंपरा ही यापुढे सुरू ठेवल्या जातील तसेच कास महाबळेश्वर येथील अतिक्रमणांच्या संदर्भात कायदेशीर बाबींचे तथ्य तपासूनच पुढील निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी येथील नियोजन भावनात प्रथमच पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना त्यांनी सविस्तरपणे उत्तरे दिली
डुडी पुढे म्हणाले कोणताही निर्णय धडकपणे घेणे हे सहज शक्य आहे . मात्र असे निर्णय चिरकाल टिकत नाहीत त्यामागे कृतिशील रचनात्मक कामाची बैठक असावी लागते . त्यासाठी व्यापक प्रयत्नांची आवश्यकता असते त्यामुळे माझा जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला असून सर्व विभाग प्रमुखांच्या बैठका यापुढे वारंवार घेतल्या जातील त्यानुसार जिल्ह्याचे पुनर्वसन सिंचन पर्यावरण आरोग्य शिक्षण याचे कोणते प्रश्न आहेत हे समजून घेणे सोपे जाणार आहे . सर्वसामान्यांच्या कामांना कधीही न अडवता तात्काळ ते निकाली कसे निघतील याची दक्षता घेतली जाईल त्यामुळे मला थोडासा वेळ द्या या वेळेत सर्व प्रश्नांचा अभ्यास करून त्यानुसार कामाचे प्राधान्यक्रम ठरवलं जाईल सातारा जिल्हा कशात आघाडीवर आहे आणि काय होणे गरजेचे आहे याचा ताळमेळ साधूनच विकास कामाच्या मुद्द्यांवर बोलणे इष्ट ठरेल असे ते म्हणाले
महाबळेश्वर येथे तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शंभर कोटीचा आराखडा राबवला होता त्या आराखड्याचा अभ्यास करून त्या धरतीवर सातारा पाचगणी कास तसेच इतर ब आणि क वर्गाची जी पर्यटन स्थळे आहेत त्यांना कशा सुविधा देता येतील याचा आराखडा अभ्यास करून बनवला जाईल असे ते म्हणाले ज्या पद्धतीने महाबळेश्वर येथे मधाचे गाव मांघर म्हणून प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील उत्पादनक्षम गावांचा अभ्यास करून त्या त्या ठिकाणी ती उत्पादने वाढवण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित भर दिला जाईल . याशिवाय गौण खनिज वाळू लिलाव तसेच इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर निश्चितच मार्ग काढून त्याची माहिती पत्रकारांना दिली जाईल असे ते म्हणाले
दोन दिवसापूर्वी दिव्यांग बांधवांचे नुकतेच आंदोलन पालकमंत्र्यांच्या घरासमोर झाले होते त्या प्रश्नावर बोलताना ड्युटी म्हणाले शासकीय कार्यालय शाळा सामाजिक संस्था व इतर सामाजिक वावर असणारे परिसर येथे दिव्यांग बांधवांना उपयुक्त असणारे रॅम्प आणि शौचालय याचा आराखडा बनवून ते तयार करून दिले जातील . दिव्यांग बांधवांना कुठल्याही कार्यालयात येताना त्रास होणार नाही याची निश्चितच काळजी घेणार आहे तत्पूर्वी दिव्यांग बांधवांची बैठक घेऊन त्यावर उपाययोजना केल्या जातील आगामी पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून सातारा जिल्ह्यातील 42 गावे दरड प्रमुख क्षेत्रामध्ये येतात तेथील भूवैज्ञानिक सर्वेक्षण करून तज्ञांची मते आजमावली जाणार आहेत त्या पद्धतीने त्या गावांच्या पुनर्वसनाच्या उपाययोजना केल्या जातील
जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवशीच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत फलटण निरा तरडगाव बरड या सर्व भागातील 67 किलोमीटर लांबीच्या मार्गावरील पालखी स्थळांची पाहणी केली होती त्याची सुद्धा माहिती त्यांनी पत्रकारांना दिली ते म्हणाले या मार्गावर पायाभूत सुविधा 3000 शौचालय 25 ॲम्बुलन्स तसेच 21 हालती आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत या पालखीतळांवर जे खाद्यपदार्थ विक्रेते येतात त्यांच्या खाद्यानाचे नमुने तपासण्याच्या दृष्टिकोनातून अन्न व औषध प्रशासनाला सूचना देण्यात आले आहेत सातारा जिल्ह्यामध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी विकास कामांचा ज्या चांगल्या परंपरा निर्माण केल्या आहेत त्या परंपरा पुढे नेण्याचा माझा निश्चित प्रयत्न असेल अशी ग्वाही त्यांनी दिली






