साताऱ्यात विविध मान्यवरांच्या उपस्थिती पार पडली उद्योग परिषद

558
Adv

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 पदे भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची महासत्ता बनवण्याचे धोरण ठेवले आहे . त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे त्या तुलनेने सातारा जिल्ह्यातून दरडोई उत्पन्न एक लाख 85 हजार रुपये असताना ही व्यवस्था कायम ठेवण्याकरिता सातारा जिल्ह्यातील उद्योजकांनी उद्योजक बनण्याचा संकल्प करून अर्थव्यवस्थेत सन्माननीय हातभार लावावा असे आवाहन केंद्रीय लघु मध्यम केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली

साताऱ्यात नक्षत्र ,उदयनराजे मित्र समूह आणि भाजप जिल्हा उद्योग आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा उद्योग परिषद 2023 चे आयोजन जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आले होते . यावेळी केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड, खासदार संजय काका पाटील, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार जयकुमार गोरे, कोरेगाव चे आमदार महेश शिंदे, माजी आमदार संजय भेगडे, डॉक्टर दिलीप येळगावकर, मदन दादा भोसले ,माजी आमदार आनंदराव पाटील, सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद निशांत पाटील रवी साळुंखे ,मनोज शेंडे, प्रदीप पेटकर, भरत पाटील, विजय भिलारे, विक्रम बाबा पाटणकर, पुरुषोत्तम जाधव,धैर्यशील कदम, जयवंत पवार, किरण बर्गे, अनुप सूर्यवंशी, रामकृष्ण वेताळ ,माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, राजेंद्र यादव, सुनील खत्री इत्यादी यावेळी उपस्थित होते

नारायण राणे पुढे म्हणाले आजच्या पिढीसाठी हा कार्यक्रम मनोरंजनाचा नाही तर रोजी रोटी कमावण्याचा आहे . महाराष्ट्रातील उद्योजकांना वीज वितरणचे दर शेजारील राज्याच्या तुलनेत अधिक वाटतात याचे कारण उद्योजकांनी जाणून घेतले पाहिजे कारण आपल्याकडे पायाभूत सुविधांचा विकास मोठ्या प्रमाणावर असून त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी आपल्याला विजेचा दर जास्त द्यावा लागत आहे . सातारा जिल्ह्यातील 30 लाखाची लोकवस्ती आहे आणि उद्योजक किती याचा विचार होणे गरजेचे आहे .दरडोई उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे पश्चिम महाराष्ट्राचा दरडोई उत्पन्न एक लाख 85000 आहेत तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दरडोई उत्पन्न दर हा दोन लाख दहा हजार रुपये आहे पश्चिम महाराष्ट्र मध्ये व्यवसाय पूरक सुविधा विकसित करणे गरजेचे आहे . महाराष्ट्र म्हणजे छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली सुखी भूमी असे म्हणले जाते आज येथे 78% साक्षरता आहे कोणत्या पायाभूत सुविधा हव्यात हे सांगणे गरजेचे आहे . 2024 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचविणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट आहे . साताऱ्यात नवीन उद्योग करणाऱ्यांनी निर्यातक्षम अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक बनावे आणि व्यवसायाची उलाढाल वाढवावी असे आवाहन त्यांनी केले . अन्न उत्पादन प्रक्रिया उद्योगासाठी अर्ज करा लघु सूक्ष्म उद्योग विभागाच्या माध्यमातून कर्ज दिले जाईल असे राणे म्हणाले . साताऱ्यात खाजगी जागेवर एकत्र येऊन जर उद्योगाची घोषणा केली तर केंद्र सरकार त्या प्रकल्पाला सहकार्य करेल असे आश्वासन राणे यांनी दिले .

. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड म्हणाले आज जगात भारत पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून जीडीपी बारा टक्के आहे . नव उद्योजकांना बॅक वित्त पुरवण्यात तांत्रिक अडचण येणार नाही . यासाठी पश्चिम महाराष्ट्रात वित्त पुरवठा करणाऱ्या बँकांच्या 78 शाखा उघडण्याची सूचना केल्याचे कराड यांनी सांगितले . साताऱ्याच्या उद्योजकांना केंद्र शासन योजना व सवलती यांचा लाभ व्हावा याकरिता उद्योग परिषदेचे व्यासपीठ उपलब्ध असल्याचे सांगितले . आमदार जयकुमार गोरे यांनीही आपले विचार मांडले

कार्यक्रमाचे प्रास्तविक भाजप उद्योग आघाडी अमोल सणस यांनी केले . कार्यक्रमाची सुरवात शिव पुतळा पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली . मास च्या वतीने अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांनी लघु उद्योजकांच्या समस्यांचे निवेदन राणे यांना सादर केले . साताऱ्याचे प्रसिद्ध उद्योजक फरोख कूपर यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील बारा उद्योजकांना उद्यमतारा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . स्नेहल दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .

Adv