सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. ती आपली खाजगी जहागिरी आहे असे कोणीही समजू नये मात्र या बाजार समितीला खाजगी व्यापारी आणि भांडवलदारांचा विळखा पडला आहे येथील सत्ताधाऱ्यांनी सहकारातल्या कोणत्या संस्था शाबूत ठेवल्यात आता असा राजकीय घनाघात खासदार छ उदयनराजे भोसले यांनी केला
मात्र बाजार समितीत परिवर्तन करण्याची वेळ आली आहे त्यामुळे शेतकरी विकास पॅनेलच्या उमेदवारांच्या पाठीशी राहा असा एक कळकळीचे आव्हान त्यांनी केले येथील
जलमंदिर या निवासस्थानी खासदार छ उदयनराजे भोसले यांनी सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले मी हडप करणार आहे असे आरोप विरोधकांनी माझ्याबरोबर केले होते याचे कारण मला माहित नाही . 1960 च्या सहकार चळवळ परिस्थितीमध्ये आणि आजच्या परिस्थितीमध्ये प्रचंड फरक पडला आहे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी त्यांच्या काळात शेतकऱ्यांचा विचार करून सहकार चळवळ वृद्धिंगत केली . मात्र सध्या काही नेते सातारा बाजार समिती ही स्वतःची खाजगी जहागिरी समजतात या जहागिरीला व्यापारी भांडवलदार दलाल यांचा विळखा पडलेला आहे जर बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांचा एखादा साधा गाळा सुद्धा नसेल तर त्याचा काय उपयोग आहे सहकाराच्या क्षेत्रात आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनी कोणत्या संस्था शाबूत ठेवले आहेत लोकशाहीमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे मात्र येथे केंद्रीकरणाच्या नावाखाली शेती प्रक्रिया उद्योग सोडून भलतेच उद्योग सुरू आहेत बाजार समितीच्या क्षेत्रामध्ये दारूची दुकाने सुरू आहेत . दारू ही काही शेतकऱ्याची प्राथमिकता नाही . आरक्षणाच्या नावाखाली कोणी किती गाळे कसे बांधले बाजार समितीच्या संदर्भातील कोणतीही आरक्षणे कधीही उठवता येत नाहीत मग सातारा बाजार समितीत असे काय घडले बाजार समितीच्या या राजकारणामध्ये मला कधीही स्वारस्य नाही यामध्ये माझा काहीही फायदा नाही दरवेळी शिवेंद्रसिंहराजे खिंडवाडी येथील 17 एकर जागेचा उल्लेख करतात तत्कालीन आयुक्तांकडे मी शेतकऱ्यांसाठी ही जागा आरक्षित रहावी आणि ती जर राहणार असेल तर जरूर ती त्यांना दिली जावी मात्र शेतकऱ्यांच्या नावाखाली या जागेचे व्यापारीकरण होणार असेल तर माझा त्याला स्पष्ट विरोध आहे
बाजार समितीतील मनवे हे यांचे लाडके होते कोण कोणाच्या घरी गेले हे आम्हाला सर्व ठाऊक आहे आम्ही राजकारण करणाऱ्यातील नाही प्रताप सिंह नगर ची 42 एकर जागा लोककल्याणसाठी आम्हीच दिली त्यावेळी आम्ही पैशाचा विचार केला नाही आम्ही सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत ईडीची चौकशी काय झाली या संदर्भातील पत्र दिले मात्र ईडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे हे डोमकावळे आहेत असा परखड आरोप छ उदयनराजे यांनी केला ती चौकशी का झाली याचे उत्तर आम्हाला अद्याप मिळालेले नाही . आर्थिक संस्था मोडीत काढायच्या आणि त्याचे आर्थिक फायदे हडप करायचे ही यांची कामे आहेत मी मरण पत्करेल पण असले आर्थिक क्षेत्रातले गैरव्यवहार करणार नाही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरच आम्ही तत्कालीन बाजार समितीतील संचालकांचे राजीनामे घेऊन मनोमिलन तोडले होते जर आमदार खासदार संधी साधू राजकारण करायला लागले तर शेतकऱ्यांनी कोणाकडे जायचे असा सवाल त्यांनी केला शिवेंद्रसिंहराजे यांनी या आरोपा संदर्भात जर हिम्मत असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी जरूर गांधी मैदानावर यावे अगदी गरज पडली तर राष्ट्रीय दर्जाची मोठी पत्रकार परिषद घेऊन आपण एकमेकांना शेजारी शेजारी बसून एकमेकांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ हिम्मत असेल तर त्यांनी ते करून दाखवावे असे खुले आव्हान उदयनराजे यांनी दिले
शेतकरी द्रोह करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांनी परिवर्तन करून घरी बसवण्याची आता गरज आहे जर हे तुम्हाला करायचं नसेल तर शेतकऱ्यांनी विष घ्यावे नाहीतर मग द्रोह करणाऱ्यांनाच विष पाजावे असा रोखठोक पण तर्कट सल्ला उदयनराजे यांनी दिला बाजार समितीतील दहशत पराकोटीला पोहोचली आहे शेतकरी बंड करून उठला तर तो केव्हा झडप मारेल याची शाश्वती नाही सातारा पालिकेच्या क्षेत्रातील बाजार समितीच्या आवारात ज्या गाळयांचे अतिक्रमण झाले आहे त्याची मी स्वतः तक्रार करणार असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायांवर कधीतरी कोणीतरी आवाज उठवलाच पाहिजे आजपर्यंत छातीला माती लावत आलेलो आहे यापुढेही मी कधी शेतकऱ्यांसाठी कोणाला अंगावर घ्यायला मी घाबरणार नाही शेतकऱ्यांचे हित न बघणाऱ्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही असा स्पष्ट करण्यात उदयनराजे यांनी करत शेतकरी पॅनेल च्या सभासदांना शेतकऱ्यांनी निवडून द्यावे असे आवाहन केले







