जनता सहकारी बँकेस विक्रमी २ कोटी ७४ लाखांचा नफा : विनोद कुलकर्णी

262
Adv

सातारा जिल्हयाची अर्थवाहिनी, सर्व सामान्यांची बँक असा नावलौकीक प्राप्त असणारी आणि जिल्हयात मुख्य कार्यालयासहीत १७ शाखांव्दारे जिल्हावासियांना बँकींग सेवा देणारी जिल्हयातील अग्रणी व विश्वासार्ह बँक म्हणून जनता सहकारी बँकेकडे बघितले जाते. बँकेला ३१ मार्च २०२३ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात विक्रमी २ कोटी ७४ लाख इतका विक्रमी नफा कमवलेला आहे. बँकेने गतवर्षातील १ कोटी ७९ लाख रुपये इतका संचित तोटा भरून काढला आहे. बँक फायनान्सिअल साऊंड ॲण्ड वेल मॅनेज्ड् या मानांकनातील सर्व निकष जवळपास पुर्ण करण्यात यशस्वी झाल्याची माहिती बँकेचे भागधारक पॅनलप्रमुख, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन आणि विद्यमान ज्येष्ठ संचालक विनोद कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
पत्रकात ३१ मार्च २०२३ चे ऑडीट पूर्व आर्थिक पत्रकांनुसार बँकेच्या स्थैर्यतेसाठी आवश्यक असणा-या सीआरएआरचे प्रमाण ९% राखणे आवश्यक असताना बँकेने मार्च – २०२३ अखेर तब्बल २२.६४ टक्के एवढे राखून बँकेची आर्थिक परिस्थिती अतिशय मजबूत असल्याचे त्यांनी नमुद केले. बँकेचे नेट वर्थ ५ कोटी आवश्यक असताना, मार्च – २०२३ अखेर ते १२.८९ कोटी एवढे आहे. बँकेने आर्थिक
वर्षात जुन्या थकीत कर्ज खात्यांमध्ये ६ कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज वसुली केली असून नेट एन.पी.ए. चे प्रमाण ७.३० राखण्यात बँक यशस्वी झाली आहे. बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले आहे. बँक भक्कम आर्थिक स्थितीत असल्यामुळे बँकेच्या सभासदांना लाभांश देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे शिफारस करणार आहे. ग्राहकांना अत्यावश्यक आधुनिक बँंकिंग सेवा देण्यासाठी प्रलंबित असणारे मोबाईल बँकिंग, आय.एम.पी.एस., क्यू आर कोड प्रस्तावास रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांची मान्यता मिळण्याबाबतची कार्यवाही नजीकच्या काळात पूर्ण होण्यास निश्चित मदत होईल असा विश्वास केला.

बँकेची वरीलप्रमाणे प्रगती होत असताना बँकेचे सर्व सन्माननीय सभासद, ठेवीदार, ग्राहक, कर्जदार व हितचिंतक, संचालक मंडळातील सदस्य व सर्व आजी /माजी सेवकांचे महत्वाचे योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. विशेषत: बँकेचे चेअरमन अतुल जाधव यांनी गत पाच वर्षापासून कोणतीही काळ वेळ न पाहता बँकेच्या आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने सर्व सहकारी संचालक सदस्यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने केलेले कामकाज फार महत्वाचे आहे. बँकेच्या या यशात बँकेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब गोसावी, जेष्ठ संचालक जयवंतराव भोसले, आनंदराव कणसे, अशोक मोने, जयेंद्र चव्हाण, अमोल मोहिते, माधव सारडा, डॉ. चेतना माजगांवकर, सुजाता राजेमहाडिक, प्रा. श्री. अरुणकुमार यादव, चंद्रशेखर घोडके (सराफ), वसंतराव लेवे, अविनाश बाचल, निशांत पाटील, रविंद्र माने, रामचंद्र साठे, वजीर नदाफ, नारायण लोहार, विजय बडेकर, तज्ञ संचालक धिरज कासट, ओंकार पोतदार, निमंत्रित संचालक अजित साळुंखे, प्रितम शहा, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य, ॲड. चंद्रकांत बेबले, विनय नागर, केतन जगदाळे, जनता बँक कर्मचारी संघाचे अध्यक्ष उमेश साठे, सेवक संचालक हमीद शेख, युवराज काळे व सर्व पदाधिकारी, पॅनेल वरील सर्व चार्टर्ड अकौंटंट, ॲडव्होकेट, बँकेचे विशेष वसुली अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार, सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गांचे मोलाचे योगदान आहे.

चौकट
भरीव पगारवाढ देण्याबाबत लवकरच निर्णय
गतवर्षीचा १ कोटी ७९ लाख रुपये संचित तोटा भरून काढून बँकेला विक्रमी २ कोटी ७४ लाख रुपयांचा नफा कमवण्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. या योगदानाची दखल घेऊन लवकरच भरीव पगारवाढ देण्याचा निर्णय संचालक मंडळ लवकरच घेणार असल्याची माहिती भागधारक पॅनेलप्रमुख विनोद कुलकर्णी यांनी दिली.

Adv