उरमोडी धरण मध्यम प्रकल्पामुळे पूर्णत: बाधित झालेल्या 9 आणि अंशत:बाधित झालेल्या 12 गावांतील प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उरमोडी धरणग्रस्तसमितीची स्थापना करण्यात आली आहे.कृती समिती कार्यकारीणीतील काही सदस्य निवर्तले आहेत,काहींनी स्थलांतर केले आहे. त्यामुळे कृती समितीचे नव्याने पुर्नगठण करणे क्रमप्राप्त
झाल्याने,आज संबंधीत प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे नवीन कार्यकारीणी घोषित करण्यात येत आहे अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घोषणा केली.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जाहिरकेलेल्या नवीन कार्यकारीणी मध्ये उरमोडी धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष म्हणून रामचंद्र लक्ष्मण वाईकर (गरुजी)कार्याध्यक्ष म्हणून माजी पंचायत समिती सदस्य बबनराव भिकु देवरे, उपाध्यक्ष संदिप लक्ष्मण सकपाळ, खजिनदार म्हणून रामदास आरगडे, तर सचिव म्हणून सुधीर किसन देसाईयांची निवड करण्यात आलेली आहे.
उरमोडी धरणग्रस्त कृती समितीने आजपर्यंत सन 1981 सालापासून प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी मोठा जनरेटा उभारुन अनेक प्रश्न मार्गी लावलेले आहेत. मोर्चे, आंदोलने,
सत्याग्रह या सारख्या लोकशाही मार्गाने मोठा लढा उभारण्यात आला आहे. त्यामुळे शासनाने आधी पूनर्वसन मग धरण ही मागणी मान्य करुन, उरमोडी क्षेत्रातील पूनर्वसन करण्यात आले
आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह अनुदान प्रदान करणे, अंशत: बाधिक गावांतील पूर्ण पुनर्वसन होणेबाबतचा खासबाब प्रस्ताव प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार जमिनीऐवजी रोखनिधी अश्या ऐतिहासिक मागण्यांचा लाभ प्रकल्पग्रस्तांना मिळवून देण्यात सिंहाचा वाटा आहे.अजुनही प्रकल्पग्रस्तांच्या काही मागण्या अपुर्ण आहेत.त्या पूर्ण करुन घेण्यासाठीविविध कारणांमुळे उरमोडी प्रकल्पग्रस्त समितीमध्ये आलेली शिथीलता दूर करुन,नव्या जोमाने, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांनुमते नवीन कार्यकारीणीची निवड -नियुक्ती करण्यात आली आहे.नवीन पदाधिकारी यांना आमच्या शुभेच्छा आणि पाठींबा कायम राहणार आहेच तथापि उरमोडी प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख समस्यांबरोबरच छोटया मोठया समस्या सोडवण्यासाठी नुतन
पदाधिकारी यांनी नियोजनपूर्वक ठाम भुमिका प्रशासनाकडे मांडावी अशी अपेक्षा खासदारश्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केली आहे.दरम्यान नव्याने निवड करण्यात आलेल्या पदाधिकारी यांचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचेसह,माजी जिल्हापरिषद सभापती सुनील काटकर, जितेंद्र खानविलकर,काका धुमाळ,बाळासाहेब ननावरे, माजी नगराध्यक्षा सौ.रंजना रावत,,जिल्हा परिषद, पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी माजी पदाधिकारी यांनी विशेष अभिनंद केले आहे.