खासदार श्री छ उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त तांदूळवाडी तालुका कोरेगाव येथे भव्य बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेबरोबरच कोलेश्वर देवस्थान समितीच्या वतीने खासदार छउदयनराजे भोसले यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती काका धुमाळ यांनी दिली
पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा स्पर्धा या मानाच्या आणि आकर्षणाचा विषय आहेत दोन वर्षांपूर्वी करोणाच्या संक्रमणामुळे कोणतेही जाहीर कार्यक्रम करण्यावर राज्य शासनाने बंदी आणली होती मात्र करोनाचे संक्रमण संपुष्टात आल्यानंतर यात्रा जत्रा आणि बैलगाडा स्पर्धा यांना परवानगी देण्यात आली आहे खासदार छ उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने तांदुळवाडी तालुका कोरेगाव येथे भव्य बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मित्र समूहाच्या वतीने रोख बक्षिसांचे आयोजन करण्यात आले आहे
या बैलगाडी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्याच्या काना कोपऱ्यातून हौशी बैलगाडी स्पर्धक तांदुळवाडी दाखल होऊ लागले आहेत खासदार छ उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती हा येथे आकर्षणाचा विषय आहे या बैलगाडा स्पर्धेच्या निमित्ताने तांदूळवाडी येथील कोलेश्वर देवस्थान व ग्रामस्थ यांच्यावतीने खा छ उदयनराजे भोसले यांचा भव्य सत्कार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे या सत्कार यानिमित्त जाहीर कार्यक्रम होत असून सर्व छ उदयनराजे समर्थकांनी या सत्कार समारंभात उपस्थित रहावे असे आवाहन उदयनराजे भोसले मित्र समूह व तांदुळवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे