एकनाथ शिंदे म्हणजे जनतेचे मुख्यमंत्री..निलेश मोरे शहरप्रमुख :- बाळासाहेबांची शिवसेना

264
Adv

जनतेचा मुख्यमंत्री…

दिवस – बुधवार वेळ : – संध्याकाळी सातची.. मंत्रालयात सगळीकडे पांगापांग सरू झालेली…मुख्यमंत्री कार्यालय आधी कॅबिनेट आणि त्यानंतर बैठकांमागून बैठकांमध्ये गढून गेलेलं..
वेगवेगळ्या विभागांच्या अधिकाऱ्यांची सहाव्या मजल्यावरील समिती कक्षातून दिवसभर ये-जा सुरू दिवसभराच्या चार-पाच बैठका आटोपून मुख्यमंत्री देखील कधीही निघतील अशी परिस्थिती..
साहेब कोणत्याही क्षणी निघणार, तेवढ्यात सहाव्या मजल्यावर तैनात असलेले पोलीस आत येऊन मुख्यमंत्र्यांना सांगतात की साहेब सकाळपासून लोकं तुमची वाट पहात आहेत. कुणीही हटायला तयार नाही. प्रत्येकाला तुम्हालाच भेटायचं आहे. त्यामुळे कृपया तुम्ही त्यांना भेटा…मुख्यमंत्री विचारतात हो का..? किती लोकं आहेत..? पोलीस सांगतात पाचशे ते सहाशे…क्षणाचाही विलंब न लावता मुख्यमंत्री अधिकाऱ्यांना आदेश देतात दोन अधिकाऱ्यांनी तातडीने लोकांच्या अर्जांची शहानिशा करायला बसा, आणि अर्जाची छाननी करून टप्प्याटप्याने आत पाठवा…
मुख्यमंत्री स्वतः सहाव्या मजल्यावरील समिती कक्षात बसतात आणि सुरूवात होते ती प्रत्येक व्यक्तीला भेटून त्याचं म्हणणं नीट ऐकून घेण्याला..त्या बरहूकुम संबंधित विभागाला निर्देश देण्यात येतात…इतका वेळ थांबलो पण थेट मुख्यमंत्र्यांनी आपलं काम मार्गी लावलं याच समाधान गाठीशी घेऊन आलेली प्रत्येक व्यक्ती पुन्हा घरी जायला निघते…
जनसामान्यांमधील एक असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असं काम करतात. गर्दी तशी त्यांना आजिबात नवीन नाही. कारण गर्दीत रमणारा नेता हीच त्यांची खरी ओळख आहे. कुठेही गेले तरीही त्यांच्याभोवती शे पाचशे लोकांचा गराडा अगदी सहज पडतो.. पण ही गर्दी काही उगाच जमत नाही तर ही गर्दी या नेत्याने कमावलेली गर्दी आहे. मुख्यमंत्री होण्या अगोदर पासूनच एकनाथ शिंदे हे कायमच गर्दीने वेढलेले असायचे. नगरविकास मंत्री असताना देखील मंत्रालयातील त्यांचं दालन कायमच गर्दीने फुललेलं दिसायचं. साहेब आलेत म्हणजे नक्की भेटणार अशी खात्री तेंव्हाही लोकांना असायची.उलट मुख्यमंत्री झाल्यावर सर्वसामान्य लोकांना आपल्यापर्यंत पोहोचण्यातअडचण वाटू नये यासाठी ते अधिक दक्ष झालेत. वारंवार लोकांना भेटून त्यांची गाऱ्हाणी ऐकून त्यांची तातडीने सोडवणूक करण्यासाठी त्यांनी दाखवलेली तत्परता पाहिली की लोकं त्यांना लोकनाथ काम म्हणतात ते जाणवल्याशिवाय रहात नाही.
३० जून २०२२ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर त्यांनी पहिली मोठी घोषणा केली ती शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याची, त्यासाठी त्यांनी नेटाने प्रयत्न करायला सुरूवात केली. अतिवृष्टीमुळे किंवा परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून त्यांना मदत देऊ केली. भूविकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या ३४ हजारशेतकऱ्यांचे ९६४ कोटी १५ लाख रूपयांचे कर्ज माफ केले, अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पटीने मदत केली त्यानुसार ४० लाख शेतकऱ्यांना ५ हजार कोटींची मदत केली. गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली. धान उत्पादक शेतकऱ्याला १५ हजार रूपयांचा बोनस देण्याची घोषणा केली. राज्यात वर्षानुवर्ष खोळंबून पडलेले अनेक सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली, कोकणातील नद्यांमधून समुद्रात वाहून चाललेले पाणी अडवून ते दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे वळवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला चालना दिली असे अनेक निर्णय ज्याचा शेतकऱ्यांना थेट फायदा होईल असे निर्णय घेण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. मात्र आपल्या दालनात एखादा गरीब शेतकरी काही सांगायला आला तर त्याचं गाऱ्हाणं ऐकून त्याला प्रसंगी स्वतःच्या खिशातून मदत करायला देखील ते कधी मागे हटले नाहीत. अशाचमंत्रालयातील एका जनता दरबारात अहमदनगर जिल्ह्यातील एक गरीब शेतकरी आला होता, त्याने थरथरत्या हाताने आपले फाटके धोतर सावरत मुख्यमंत्र्यांच्या हातात एक मळकी चिठ्ठी दिली. त्यात लिहिलं होतं की मी अमूक अमूक गावचा असून पूर्वी शिवसैनिक होतो, मात्र गेल्या काही वर्षात जमिनीवर कर्ज झालं आणि ते फेडणं अशक्य होऊन बसलं आहे. घरातून रोज भल्या पहाटे शेतावर जाऊन बसतो तो थेट रात्री उशीरा घरी परततो, कर्जबाजारी झाल्यामुळे दोन्ही मुलं सतत मला दुषणं देतात. शेवटचं म्हणून तुम्हाला भेटायला आलो आहे अन्यथा आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही…मुख्यमंत्र्यांनी शांतपणे ते पूर्ण पत्र वाचलं त्यांना जरा बाजूला थांबायला सांगितलं. दरम्यान आपल्या अधिकाऱ्यांना सांगून अदमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन करायला सांगितला. सुदैवाने काहीतरी कामानिमित्त ते मंत्रालयातच होते. थोड्याच वेळात ते मुख्यमंत्री दालनात आल्यावर त्या म्हाताऱ्या शेतकऱ्याचे नक्की किती कर्ज आहे कुणाकडून घेतलं आहे याची शहानिशा करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना द्यायचे ते आदेश दिले. मात्र त्याची परिस्थिती बघून स्वतः तेच एवढे बैचेन झाले की त्यांनी वैयक्तिकरित्या देखील त्यांना मदत देऊ केली. सांगायचं हेच की मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसल्यावर देखील यामाणसाने आपल्यातील संवेदनशिलता हरवू दिलेली नाही. मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर दर बुधवारी मुख्यमंत्री हमखास भेटतात हे लोकांना एव्हाना माहित झालेले आहे. त्यामुळे त्यादिवशी जनता दरबारात अनेकजण आपले प्रश्न घेऊन येतात. मात्र लोकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चाललेली पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्येक दिवस दोन अधिकाऱ्यांची ड्युटी ही फक्त आलेल्या लोकांचे प्रश्न त्यांची गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी लावलेली आहे. त्यातील काही किरकोळ प्रश्न असतील तर ते जागच्या जागी सोडवा असे स्पष्ट निर्देश या अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनेक छोटे मोठे विषय हे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याआधीच सुटलेले असतात. काही विषयांच्या बाबतीत मात्र हे अधिकारी स्वतः त्या त्या विभागांचे सचिव, उपसचिव किंवा संबंधित अधिकाऱ्याकडे वर्ग करतात. त्यामुळे अनेकांचे प्रश्न सुटायला मदत होत असल्याचं चित्र मंत्रालयात पहायला मिळते. थोडक्यात काय तर गेल्या अडीच वर्षात पूर्णपणे थंडावलेले मुख्यमंत्री कार्यालय हे आता अधिक वेगाने काम करायला लागले आहे.
मुख्यमंत्री कार्यालयात अनेक जण वैद्यकीय मदत मिळावी यासाठी येतात. वैद्यकीय हवी असल्यास मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे ते प्रकरण वर्ग करण्यात येते. निकषात बसणारे प्रकरण असेल तर जमेल तेवढ्या लवकर ती मदत त्या रूग्णाला उपलब्ध करून दिली जाते. एखाद्या प्रकरणात ते रूग्णालय शासनाच्या आरोग्य योजनेच्या कार्यकक्षेत येत नसेल पण त्या रूग्णाला मदतीची नितांत गरज असेल तर विशेष बाब म्हणून देखील त्याला मदत केली जाते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईल्स हे मुख्यमंत्री कुठेही असले तरीही त्यांच्यापर्यंत विनाविलंब पोहचवून तातडीने त्यांच्यावर स्वाक्षऱ्या केल्याजातात. या फाईल वेळच्या वेळी हातावेगळ्या करण्याकडे मुख्यमंत्री शिंदे स्वतः दक्ष असतात. याशिवाय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे आणि त्यांचे सर्व वैद्यकीय सहाय्यक अनेक रूग्णांना जीवनदान देण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या अथक मेहनतीच्या बळावरच या कक्षाने ३ हजार ६०० रूग्णांना २८ कोटींहून अधिक रूपयांची वैद्यकीय मदत केलेली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जून महिन्यात मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले त्यानंतर जेवढ्या जेवढ्या मोठ्या दुर्घटना राज्यात घडल्या त्या प्रत्येक दुर्घटनेची तात्काळ दखल घेऊन त्यात जखमी असलेल्या रूग्णांना मदत करण्याबाबत मुख्यमंत्री कायमच दक्ष असतात. कार्तिकी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांचा सांगोला येथील जुनोनी येथे दिंडीत भरधाव ट्रक घुसल्याने भीषण अपघात झाला. त्यात आठ वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला होता तर सहा जण गंभीररित्या जखमी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी तातडीने या अपघाताची दखल घेऊन मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख तर जखमी वारकऱ्यांवरशासकीयख्रर्चाने उपचार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. औरंगाबाद मधील वैजापूरात वीजेचे काम करताना तीन कंत्राटी कामगारांचा वीजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. खरं तर शासकीय नियमानुसार कंत्राटी मजूरांना शासकीय मदत देता येत नाही तरिही विशेष बाब म्हणून या मजुरांच्या कुटुंबियांना पाच लाख रूपयांची मदत त्यांनी जाहीर केली. सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर भल्या पहाटे खाजगी आराम बस आणि ट्रक एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात झाला यात बसने पेट घेतल्यामुळे २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मुख्यमंत्र्यांनी तातडीने या दुर्घटनेची दखल घेऊन संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला घटनास्थळी पाठवले. एवढ्यावरच न थांबता घटनेचे गाभिर्य ओळखून स्वतः देखील नाशिकला रवाना झाले. घटनास्थळी भेट देऊन प्रशासनाला सूचना दिल्याच पण रूग्णालयात जाऊन जखमींची देखील विचारपूस केली. जी तत्परता त्यांनी नाशिकमधील या अपघातावेळी दाखवली तीच तत्परता जिंदाल कंपनीत भीषण आग लागली तेंव्हाही दाखवली. त्यादिवशी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेल्या भव्य कृषीमहोत्सवाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री सिल्लोडमध्ये होते. मात्र तिथे असतानाच त्यांना या दुर्घटनेची माहिती मिळाली. सुरूवातीला तिची व्याप्ती कळत नव्हती. तरिही घटनेचे गांभिर्य लक्षात घेता त्यांनी या कार्यक्रमात भाषण करणे टाळले आणि तातडीने नाशिककडे रवाना झाले. तिथे जाऊन त्यांनी जखमी कामगारांची भेट घेतली आणि प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आग लागण्याची कारणे जाणून घेतली. हे सांगण्याचं कारण एवढंच की मुख्यंमंत्रीपदी असले तरीही त्यांच्यातील संवेदनशील माणूस हा कायम सजग असतो. गरीबांच्या अडचणीची जशी त्यांना जाण आहे तशीच मानवी जीवाचं मोल देखील त्यांना कळतं. त्यामुळेच संवेदनशील मुख्यमंत्री म्हणूनच ते आजही ओळखले जातात.
जशी मंत्रालयात लोकांची रिघ असते तशीच ती ठाणे येथील शुभदीप आणि वर्षा बंगल्यावर देखील असते. तिथे देखील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी काही अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत. एकही व्यक्ती मुख्यमंत्री भेटले नाहीत किंवा काम झाले नाही म्हणून रिकाम्या हाताने परतू नये यासाठी ते कायम दक्ष असतात. रात्री उशीरापर्यंत कार्यरत असलेले मुख्यमंत्री हे आपल्या घरातून बाहेर पडताना जरी त्यांना कुणी अडवलं तरीही गाडी थांबवून लोकांचं म्हणणं ऐकून घेतात, संबंधित अधिकाऱ्यांना ते समजून घेऊन तो प्रश्न सोडवण्याचे निर्देश देऊनच पुढे जातात. आता मुंबईत वर्षा बंगल्यावर रहात असल्याने कधी ठाण्याला आले आणि त्यांना थोडा जरी अवधी मिळाला तरीही बाहेर भेटण्यासाठी आलेल्या लोकांना आत बोलावून ते तातडीने त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. जमतेचा मुख्यमंत्री हा जनतेत मिसळून काम करत असतो…काळ वेळ ठिकाण याची परवा न करता…तेही अगदी अव्याहतपणे…

निलेश सुभाष मोरे
शहरप्रमुख :- बाळासाहेबांची शिवसेना सातारा शहर
संपर्कप्रमुख :-शिवसेना वैद्यकिय मदत कश्य,सातारा जिल्हा..

Adv