गृहलक्ष्मी ते उद्योग लक्ष्मी महोत्सवामध्ये तब्बल दहा लाखाची उलाढाल

267
Adv

खा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रपरिवार यांच्या वतीने आयोजित गृहलक्ष्मी ते उद्योग लक्ष्मी महोत्सवाला महिला बचत गटातील भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे यांच्या या अभिनव संकल्पनेतून साकारलेल्या महोत्सवात 72 स्टॉलच्या सहभागाद्वारे तब्बल दहा लाखाची उलाढाल झाली आपले उत्पादन आपली बाजारपेठ या वेगळ्या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात निशुल्क स्टॉल्सची नोंदणी हे या महोत्सवाचे अनोखे वैशिष्ट्य ठरले

विलासपूर,गोळीबार मैदान गोडोली परिसरातील अनेक होतकरू आणि स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांनी या महोत्सवाचे तोंड भरून कौतुक केले सतत प्रवाहाच्या पेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष आणि खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक संग्राम बर्गे यांनी घेतलेला आहे . त्यातूनच आपले उत्पादन आपली बाजारपेठ या अभिनव संकल्पनेवर आधारित महिला भगिनींसाठी गृहलक्ष्मी ते उद्योग लक्ष्मी महोत्सव 2023 यांना येथील गजानन गार्डन समोरील मैदानावर जोरकसपणे रंगला . या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी सातारा विकास आघाडी आघाडीचे मार्गदर्शक एडवोकेट दत्ता बनकर माजी नगराध्यक्ष सुजाता राजे महाडिक स्मिता घोडके माजी शिक्षण सभापती सुनील काटकर माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते . कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली मान्यवर उपस्थित व उद्योजक महिलांचा सन्मानचिन्ह व फेटा घालून सत्कार करण्यात आला या महोत्सवाच्या संदर्भात प्रास्ताविक करताना संग्राम बर्गे म्हणाले , “आपले उत्पादन आपली बाजारपेठ या संकल्पनेवर हा महोत्सव आधारित आहे . सातारा जिल्ह्यामध्ये महिलांच्या विशेषतः महिला बचत गटांच्या तसेच होतकरू महिलांमध्ये प्रचंड कलागुण आहेत .त्यांनी बनवलेल्या वस्तूंना चांगली बाजारपेठ मिळावी आणि त्या बाजारपेठेच्या माध्यमातून चांगले अर्थाजन व्हावे यासाठी गृहलक्ष्मी ते उद्योग लक्ष्मी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे या माध्यमातून महिला स्वयंपूर्ण होणार असून त्यांना बचतीची सवय होणार आहे .

दोन दिवस चाललेल्या या महोत्सवामध्ये महिलांनी बनवलेले मसाले,पापड, कुरडया, विविध प्रकारचे सांडगे, शुभेच्छा वस्तू ,नानाविध पद्धतीने तयार केलेल्या विविध वस्तू, सौंदर्यप्रसाधने, फूड स्टॉल असे वेगवेगळे स्टॉल्स पहावयास मिळाले . सुमारे 90 टक्के महिलांनी आपला उद्योग सुरू करण्याच्या आधीच या स्टॉलच्या माध्यमातून सहभाग नोंदवून आपली उद्यमशीलता प्रकट केली . सर्व स्टॉल धारक महिलांची नोंदणी संपूर्णतः निशुल्क करण्यात आली होती अशा आगळावेगळा महोत्सवाला गोडोली विलासपुर गोळीबार मैदान परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . आणि दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात भरपूर खरेदी केली प्राप्त झालेल्या माहितीनुसार या महोत्सवात तब्बल दहा लाखाची उलाढाल झाली . अनेक उद्योजक महिलांनी हा आगळावेळा उपक्रम अत्यंत चांगला होता गृहलक्ष्मी ते उद्योग लक्ष्मी या व्यासपीठाच्या माध्यमातून चांगले अर्थाजन होऊन विपणनासाठी वेगळी संधी मिळाल्याचे मत आवर्जून महिला उद्योजकांनी व्यक्त केले आपले उत्पादन आपली बाजारपेठ या अभिनव संकल्पनेसाठी सर्व महिला उद्योजकांनी संग्राम बर्गे यांना आवर्जून धन्यवाद दिले

या महोत्सवाची दखल खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट दिल्लीवरून घेतली अधिवेशनाच्या कामात व्यस्त असतानाही उदयनराजे यांनी वेळात वेळ काढून गृहलक्ष्मी उद्योग लक्ष्मी या महोत्सवाला थेट भ्रमणध्वनी वरून शुभेच्छा दिल्या महिलांच्या उद्योजकतेला वाव देणारे महोत्सव वारंवार व्हावेत अशा महोत्सवांना महिलांनी सहभाग नोंदवावा व या संदर्भात केंद्र शासनाच्या ज्या योजना असतील त्या योजनांचा लाभ विलासपूर गोळीबार मैदान गोडोली या परिसरातील उद्योजक महिलांना करून दिला जाईल असे थेट आश्वासन खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले उद्योजक महिलांसाठी गृहलक्ष्मी ते उद्योग लक्ष्मी हा संग्राम बर्गे यांचा पहिलाच प्रयत्न चांगलाच यशस्वी ठरला

Adv