Wednesday, May 27, 2026
spot_img
Home Satara District सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

242
Adv

जिल्ह्याच्या विकासासाठी लागणारा निधी आवश्यक त्या प्रमाणात वितरीत करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

जिल्हा वार्षिक योजना (सर्व साधारण) सन 2023-24 प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी राज्यस्तरीय बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाली.जिल्ह्यातील खासदार आमदार व विविध विभागाचे प्रमुख अधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्ह्याच्या डोंगरी भागातील रस्त्यांच्या विकासासाठी सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री जयवंशी यांना करून उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, पर्यटन विकासासह ग्रामीण रस्ते आणि डोंगरी भागातील रस्ते याचा सविस्तर आराखडा सादर करावा.

पालकमंत्री श्री देसाई म्हणाले.जिल्हा हा ८० टक्के डोंगरी आहे.या डोंगरी भागातील रस्ते, पाणी व इतर मूलभूत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वाढीव निधी मिळावा.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी जिल्ह्यासाठी 2023-24 साठीच्या सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजना आराखड्याची सविस्तर माहिती सादर केली तसेच आवश्यक त्या
वाढीव निधीची मागणी केली.

Adv