Monday, April 20, 2026
spot_img
Home Satara District Khatav सेवागिरी महाराजांचा उद्या अमृतमहोत्सवी रथोत्सव सोहळा

सेवागिरी महाराजांचा उद्या अमृतमहोत्सवी रथोत्सव सोहळा

447
Adv

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र पुसेगाव येथील सिद्धहस्त योगी परमपूज्य सद्गुरू श्री सेवागिरी महाराजांच्या अमृतमहोत्सवी पुण्यस्मरणानिमित्त रथ पूजन सोहळा आज गुरुवारी सकाळी ९ वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि विविध खात्याच्या मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज आणि ट्रस्टचे चेअरमन संतोष उर्फ बाळासाहेब जाधव यांनी दिली.

रथोत्सव सोहळ्यास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई, खा.छ उदयनराजे भोसले, खा. श्रीनिवास पाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, खा. संजयकाका पाटील, आ. रामराजे नाईक निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, आ. जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, आ. राहुल कुल, आ. बाळासाहेब पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधिक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन बाळासाहेब जाधव, विश्वस्त गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
पहाटे श्री सेवागिरी मंदिरातील पारंपरिक धार्मिक विधी, पूजा हे कार्यक्रम मठाधिपती, पुजारी व विश्वस्त यांच्या हस्ते पार पडतील. त्यानंतर श्री सेवागिरी महारांच्या पादुका व प्रतिमेचे पूजन करून त्यांची रथात स्थापना करण्यात येईल मान्यवरांच्या हस्ते रथपूजन झाल्यानंतर रथयात्रेस सकाळी ९:३० वा. सुरुवात होईल.

रथोत्सवादिवशी देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांना बुंदीचा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. श्री सेवागिरी मंदिर, सांस्कृतीक भवन व स्वागत कमानीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टकडून रथोत्सवाची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. यात्रेसाठी खेळण्याची दुकाने, सौंदर्यप्रसाधने, पाळणे, सिनेमागृह, मिठाई, हॉटेल, विविध दुकाने मोठ्या थाटामाटात सजलेली आहेत. रथोत्सवाच्या निमित्ताने पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला असून आजच्या दिवशी पुसेगावतील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

Adv