श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा फोन आणि उपोषण सुटले

187
Adv

लष्कर – छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचं विधान करणाऱ्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पदावरून त्वरित हटवावे यासाठी आमरण उपोषण करणाऱ्या चार तरुणांना उपोषणाच्या चौथ्या दिवशी खा श्री छ उदयनराजे भोसले यांनी फोन करून उपोषण थांबवण्यासाठी दिलेल्या आदेशाने आज ज्यूस पिऊन आमरण उपोषण सोडले.

महाराष्ट्रात सर्वत्र राज्यपाल विरोधात संतापाची लाट उठलेली असताना राज्यपाल हटावमोहिम अधिक तीव्र करत पुण्यातील विशाल शिंदे, निखिल पावसेटवार व पंकज शिंदे या तीन
तरुणांनी एकत्र येत दलीत पँथर संघटनेच्या माध्यमातून यशवंत नडगम यांच्या मार्गदर्शनाखालीजिल्हाधिकारी कार्यालय जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या बाहेर राज्यपालांना
हटवावे म्हणून गेल्या शनिवार पासून आमरण उपोषण सुरू केले होते, या उपोषणाची दखल घेत राज्यपालांना तर आम्ही सोडणार नाहीच किंबहुना राज्यपाल हटाव मोहीम अधिक तीव्र करू पण आज आमचे हे मावळे खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे त्यांच्या जीवाशी आम्ही अजिबात तडजोडकरणार नाही. सध्या कौटुंबिक कारणास्तव बाहेर असल्याने आम्हाला प्रत्यक्ष उपोषणस्थळी भेट देता आली नाही मात्र लवकरच पुण्यात आल्यावर या मावळ्यांची भेट घेऊ असे देखील खासदार
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे फोन वर म्हणाले.

Adv