सातारा जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने 318 पैकी एकहाती 98 ग्रामपंचायती जिकल्या आणि भाजपा सातारा जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष ठरला असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले
भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट ) यांच्या युतीत एकूण 198 जगावर विजय मिळवत महाविकास आघाडीला घोबीपछाड दिला महाविकास आघाडीला तीन पक्ष एकत्र येऊनही फक्त 92 जागांवर समाधान मानावे लागले
सातारा जिल्हा हा आता भाजपाचा बालेकिल्ला होत आहे, सातारा जिल्ह्यात निवडून आलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो अपक्ष आणि इतर निवडून आलेल्यांपैकी अनेक जण आगामी काळात भाजपा मध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत इथून पुढेही प्रत्येक कार्यकर्त्याला पाठबळ दिले जाईल आणि येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीतही भाजपा एक नंबर चा पक्ष ठरेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला
सातारा जिल्हा.
एकूण ग्रामपंचायती 318
भाजप 98
भाजप +शिंदे गट 32
शिंदे गट 69
एकूण भाजप,शिंदे गट युती 198
राष्ट्रवादी 78
काँग्रेस 7
ठाकरे गट 7
एकूण महविकास आघाडी 92
अन्य 28