कोरेगाव विधानसभा मतदार संघातील एकूण २७ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

384
Adv

ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक २०२२ मध्ये कोरेगाव मतदार संघातील ४७ ग्रामपंचायतपैकी ९ ग्रामपंचायतींची बिनविरोध व उर्वरित लागलेल्या ३८ ग्रामपंचायतीपैकी आ. शशिकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोरेगाव तालुक्यातील १४ ग्रामपंचायती, सातारा तालुका ०४ ग्रामपंचायती, खटाव तालुक्यातील ०१ ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. तसेच बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायत पैकी कोरेगाव तालुका ५, सातारा तालुका ३ एकूण ८ अशा एकूण २७ ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवलेले आहे. तसेच कुमठे, पिंपोडे खुर्द, खडखडवाडी, आरफळ, आरळे या ग्रामपंचायतीवर उपसरपंच पदसह
(बहुमत) मिळवलेले आहे.

कोरेगाव तालुक्यातील गावे अंबवडे सं. कोरेगाव, जरेवाडी, शिरंबे, वडाचीवाडी, वाघजाईवाडी, कवडेवाडी, रामोशीवाडी, सांगवी, आसगाव, चिमणगाव, धुमाळवाडी, एकंबे, गुजरवाडी, जांब खुर्द, बिनविरोध बनवडी, खेड, रूई, सायगाव, खामकरवाडी, सातारा तालुक्यामध्ये वडूथ, रेणावळे, मर्ढे, मालगाव, बिनविरोध आसगाव, न्हाळेवाडी, खावली खटाव तालुक्यामध्ये ललगुण ग्रामपंचायत मध्ये विजय मिळवलेला आहे.

निवडूण आलेल्या सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांचे आ. शशिकांत शिंदे यांनी अभिनंदन केले व सर्व गावांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले.

Adv