नक्षत्र प्रदर्शनात सहभागी 260 महिलांचा झाला सत्कार

195
Adv

नक्षत्र परिवाराच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील महिला उद्योजकांना सक्षम व्यासपीठ निर्माण करून दिले आहे या माध्यमातून महिला उद्योजकांनी आपला आर्थिक स्तर उंचवावा आणि नक्षत्र परिवार हा आभाळा इतका उंच व्हावा अशी अपेक्षा खासदार छ उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.

नक्षत्र परिवाराच्यावतीने येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर आयोजित पाच दिवस चाललेल्या महिला बचत गटाच्या उत्पादन प्रदर्शनाचा शानदार समारोप झाला . या पाच दिवसाच्या प्रदर्शनामध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाली या प्रदर्शनामध्ये 260 महिला बचत गटाच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता या प्रदर्शनाला समारोपाच्या दिवशी नक्षत्र परिवाराच्या अध्यक्षा श्री छ दमयंतीराजे भोसले आणि प्रमुख मार्गदर्शक खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट दिली. यावेळी खासदार छ उदयनराजे भोसले मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी व्यासपीठावर महोत्सवांच्या उपाध्यक्ष स्मिता घोडके ,सुजाता राजे महाडिक, माया पवार धनश्री महाडिक तसेच परिवाराच्या सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होत्या.

खासदार छ उदयनराजे भोसले पुढे म्हणाले की प्रत्येक कार्पोरेट कंपनीच्या विभागात रिसर्च अँड डेव्हलपमेंट हा भाग असतो यामध्ये महिलांचा भरणा अधिक असतो कारण महिलांची एकाग्र शक्ती पुरुषांच्या तुलनेने अधिक असते लिज्जत पापड सारख्या उद्योगांमध्ये काही महिलांनी एकत्र येऊन हा व्यवसाय सुरू करत त्याला एक वेगळी उंची दिली नक्षत्र परिवार सुद्धा सातारा जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी सातत्याने सक्रिय आहे या प्रदर्शन चळवळीने सोळा वर्षाचा टप्पा गाठला असून महिला बचत गटाचे संघटन या माध्यमातून मजबूत होत आहे केंद्र शासनाच्या मायक्रो आणि मॅक्रो लेव्हलच्या उद्योगांना केंद्र शासनाकडून वेगवेगळ्या माध्यमातून दोन कोटी पासून 50 कोटी रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते केंद्र शासनाच्या या योजनेमध्ये प्रकल्पांचा डी पी आर तयार करणे बँकांचा कर्ज पुरवठा तसेच उत्पादनांना व्यासपीठ अशा विविध पद्धतीने मार्गदर्शन केले जाते यासंदर्भात महिलांना काही मार्गदर्शन हवे असल्यास त्या पद्धतीचे मनुष्यबळ आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिली जाईल याचा उपयोग करून नक्षत्र मध्ये सहभागी झालेल्या महिला उद्योजकांनी आपला आर्थिक तर उंच करून स्वयंपूर्ण बनावे आणि नक्षत्र परिवार सुद्धा या माध्यमातून आभाळा इतका उंच व्हावा अशी अपेक्षा छ उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली

महिलांच्या उद्योगासंदर्भात कोणत्याही अडचणी आल्यास आपण शेवटपर्यंत सहकार्य करण्यास तयार आहोत असे आश्वासन छ उदयनराजे यांनी दिले खासदार छ उदयनराजे भोसले आणि दमयंती राजे भोसले यांनी सर्व स्टॉल्सला भेटी देऊन महिला उद्योजकांशी संवाद साधला खासदार छ उदयनराजे भोसले यांच्या हस्ते महोत्सवात सहभागी झालेल्या 260 महिला उद्योजकांचा विशेष सत्कार करण्यात आला नक्षत्र परिवाराच्या वतीने दमयंती राजे भोसले यांना विशेष भेट वस्तु देण्यात आल्या नक्षत्र परिवार हा एक स्वयंपूर्ण परिवार असून महिला बचत गटांसाठी वाहून घेतलेली ही एक चळवळ आहे या चळवळीची वाटचाली यापुढेही अशाच पद्धतीने सक्षमरित्या सुरू जाईल अशी स्पष्ट ग्वाही दमयंती राजे भोसले यांनी आपल्या मनोगतात बोलताना दिली

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मिता घोडके यांनी केले कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रतिप्रमाणे दीप प्रज्वलन करण्यात आले नक्षत्र परिवारांच्या सर्व सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला माया पवार यांनी सूत्रसंचालन केले व सुजाता राजे महाडिक यांनी आभार मानले

Adv