Thursday, April 23, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City आपला भारत बाह्य आणि अंतर्गत दोन्ही शत्रूंशी सामर्थ्याने सामना करतोय – पंतप्रधान...

आपला भारत बाह्य आणि अंतर्गत दोन्ही शत्रूंशी सामर्थ्याने सामना करतोय – पंतप्रधान मोदी

188
Adv

भारताने नेहमीच युद्धाकडे शेवटचा उपाय म्हणून पाहिले आहे, परंतु देशावर वाईट नजर टाकणाऱ्याला चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद आणि रणनीती सशस्त्र दलांकडे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. कारगील मधील सैनिकांसमवेत दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान आज तिथे गेले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी 1999 मध्ये कारगिल संघर्षानंतर या सीमावर्ती प्रदेशाला दिलेल्या भेटीची आठवण करून दिली,त्यावेळी भारतीय सैन्याने “दहशतवादाचा विळखा ठेचून काढला” होता असे त्यांनी नमूद केले. दिवाळी “दहशतवादाच्या समाप्तीच्या उत्सवाचे” प्रतीक आहे असे ते म्हणाले.

Adv