सातारा पोवईनाका येथील ग्रेडसेपरेटरचे काम, या क्षेत्रातील तज्ञ असणा-या मे.सी.व्ही.कांड कन्सलटन्सी,बाणेर पुणे या फर्मच्या सल्यानुसार, केंद्रीय मार्ग निधी मधुन करण्यात आले आहे. हे काम करण्यापूर्वी याकन्सल्टन्सी कंपनीने,पोवईनाका व परिसरातील वाहतुकीचे बारकाईने सर्व्हेक्षण केले आहे. पोवई नाक्यावरील वाहतुकीचाअसणारा सुमारे 56 टक्के ताण दूर करण्यासाठी आत्ता जसा आहे तसा ग्रेडसेपरेटर बनवण्याचा सुक्ष्म निरिक्षण अहवाल त्यांचा अहवाल आहे. त्यामुळे ग्रेड सेपरेटर एक निरुपयोगी आहे असे अक्कलेचे तारे तोडणा-यांच्या अफाट बुध्दीमत्तेची किव करावीशी वाटते अश्या शब्दात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी संबंधीतांचे नांव न घेत फटकारले आहे.
कोणत्याही सुधारणा पचनी पडण्यास काही व्यक्तींकरीता, काही कालावधी जावा लागतो असे नमुद करुन,खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे की, ग्रेडसेपरेटरचीआवश्यकता जाणुन, केंद्रीय मार्ग निधी मधुन, ना.नितिनजी गडकरी यांच्याकडून, सातारा पोवईनाका येथे ग्रेडसेपरेटर उभारण्याच्या कामाला मंजूरी मिळालेली आहे. केंद्राचा किंवा राज्याचा कोणताही मोठा प्रकल्प उभारणेचा झाल्यास,त्यापूर्वी त्या भागाचे संपूर्ण सर्व्हेक्षण, निरिक्षण आणि आवश्यकता, गरज याचा सर्वंकक्ष विचार करुनच निर्णय घेतलाजातो. त्यानुसारच पोवईनाक्याच्या ग्रेडसेपरेटरची कार्यवाही करण्यात आलेली आहे. याकरीता करण्यात आलेल्यासर्वेक्षणामध्ये पोवईनाका येथे सर्व प्रकारची वाहने प्रतितास 12237 आणि प्रतिमिनीट 185 इतक्या संख्येने वाहने जात होती असा साधार निष्कर्ष नोंदविला आहे. तसेच या ठिकाणी आठ रस्ते एकत्र येत असल्याने, आयआरसी च्या
मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रेडसेपरेटरचे डिझाईन तयार करण्यात आलेले आहे. अतिशय सुक्ष्मपातळीवर जावून,सर्व बाजुंचा आणि बाबींचा विचार करुन, हा ग्रेडसेपरेटर मुदतीत ठेकेदार कंपनीकडून उभारणेत आलेला आहे.पोवई नाक्यावरील ग्रेडसेपरेटरची लांबी,महाराष्ट्रातील अस्तित्वातील ग्रेडसेपरेटर्स मध्ये सर्वांत जास्त आहे हे एक वेगळे वैशिष्टय या ग्रेडसेपरेटरचे आहे. पोवईनाक्यावर पूर्वी पावसाचे पाणी रस्त्यावर येत असे त्यामुळे रस्त्यावर खड्डेपडत होते, ती समस्या देखिल आता उद्भवत नाही.
मोर्चे, आंदोलने, रॅलीज, किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे पोवईनाक्यावर वाहतुकीची कोंडी झाल्याचेग्रेडसेपरेटर झाल्यावर आढळुन आलेले नाही. ग्रेडसेपरेटरपूर्वी पोवईनाक्यावरुन, दिवसभरामध्ये एसटी महामंडळाची3226 फे-यांची वाहने पावईनाक्यावरुन ये-जा करीत असत. आज या वाहनांचा पोवईनाक्यावर पडणारा मोठा भारकमी झालेला आहे. त्यामुळे इंधन आणि प्रवाश्याच बचत झालेली आहे.ग्रेडसेपरेटर झाल्यामुळे निरिक्षण निष्कर्षानुसार पोवईनाक्यावरील सुमारे 56 टक्के वाहतुक कमी झाली आहे. आजही ग्रेडसेपरेटरचा वापर गरज असणारे करीत आहेतच, तसेच भविष्यात ग्रेडसेपरेटर ही एक अनन्यसाधारण पर्याय सातारकरांना ठरणारा आहे.त्यामुळेच सर्व तांत्रिक बाजुंचा या विषयात तज्ञ असणा-यांनी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सक्षमअभियंत्यांच्या देखरे खीखाली पोवईनाका येथे ग्रेडसेपरेटर उभारणेत आला असल्याने, कोणातरी आगंतुकाने उठावे आणि ग्रेडसेपरेटर बिनकामाचा आहे असे म्हणावे किंवा ग्रेडसेपरेटरमध्ये हॉरर शो चे आयोजनास ज्यांनी परवानगी नगरपरिषदेकडे मागीतली त्या अज्ञानी परंतु सज्ञान व्यक्तींच्या प्रगल्भ विचारांची किव वाटतेच परंतु यानिमित्ताने संबंधीतांची वैचारिक दिवाळखोरी मात्र जनतेसमोर आली आहे असा टोलाही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लगावला आहे.