आमचे उशिराचे शहाणपण आहे नमुद करुन, पाईपलाईनचे काम आम्हीच मार्गी लावले अशी अप्रत्यक्ष कबुलीच तुम्ही दिली आहे. त्याचवेळेस पाईपलाईनचे काम प्रशासकांनी केले तुम्ही नाही केले असेही म्हणत आहात.हा शुध्द गाढवपणा आहेच परंतु ही भोंदूगिरी सुध्दा आहे. धरणाबरोबरच पाईपलाईन दोन वर्षापूवीच करायला पाहीजे होती असे यांचे म्हणणे, लग्ने ठरवतानाच मुलं सुध्दा पाहीजेत या म्हणण्यानुसार आहे. अरे हो..पण त्यासाठी निधीची उपलब्धता, तसेच धरणाला दोन वर्षे लागणार तर आत्ताच पाईपलाईनचा निधी कसा मंजूर होणार, इतर ठिकाणी निधी दयायचा किंवा नाही यासाध्या मर्यादा एक लोकप्रतिनिधी असून सुध्दा त्यांच्या लक्षात येत नाही. पी हळद आणि हो गोरी असे यांचे विक्षिप्त धोरण
आहे असा मिश्किल टोला लगावत आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी धरणाची उंची वाढवताना
पाईपलाईन पाहीजे होती तर धरण उंची वाढवण्याचे काम सुध्दा तुमच्या सर्वसत्ताधिश असतानाच्या काळातच व्हायला पाहीजे होते असे आम्ही आज म्हणायचे का१ असा मार्मिक सवाल करत परखड शब्दात खरपूस समाचार घेतला आहे.कास धरणाची पाईपलाईन मंजूर करून घेतल्यावर त्याचीनागरीकांसाठी माहीती प्रसिध्दी केली तर यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली
असे नमुद करुन, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, कास धरण उंची वाढवण्याचे काम आम्ही सर्वप्रथम प्रस्तावित केले. जिकीरीच्या असणा-या परवानग्या आणि विविध मंजू-या घेण्यासाठी किती पाठपुरावा करावा लागला हे आयत्या पिठावर रेघोटया मारणा-यांना समजणारच नाही. त्यामुळेच तर अमक्या अमक्या दादांनी निधी दिला, तुम्ही काय केले असे सांगत सुटले आहेत.त्यांच्या नेहमीच्या सवईप्रमाणे नुसते भ्रष्टाचार टक्केवारी कळवंड असे बिनबुडाचे व बेलगाम आरोप करण्या शिवाय त्यांना आता काही काम राहीले नाही.कदाचित ते ज्यांचा लगतचा वारसा सांगतात ते जेव्हा सर्व सत्ताधिश होते त्यावेळी भ्रष्टाचार आणि भ्रष्टकारभारच केला असेल म्हणून त्यांना आम्ही देखिल तसेच केले असावे असा गोड गैरसमज झाला असावा. त्याच्या काळात डांबरचोरी कशी झाली १ बोगस टयुब लाईटची बिले कशी काढली यासह अनेक
बाबी जगजाहीर झाल्या. नगरपरिषद एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यामुळे नगरपरिषदेमध्ये ज्यांच्याकडे सत्ता असते
त्यांच्या एकंदरीत कारभारावर भ्रष्टाचार केला असे आरोप करणे हे सोपे असते या भावनेतुन आम्ही कधीही या आरोपांची
जाहीर वाच्यता केली नव्हती.सातारकरांनी यांच्या झुंजार नेतृत्वासह पाच वर्षापूर्वीच यांना पुढच्या अनंतकाळाकरीता हद्यपार केले आहे.
त्यांच्याकडे आता कधीच नगरपरिषदेची सत्ता येणार नाही म्हणूनच भ्रष्टकारभार इतकाच आरोप करणे त्यांच्याकडे शिल्लक
राहीले आहे.ते करीत असलेले आरोप सप्रमाण सिध्द करण्याची जबाबदारी मात्र ते घेत नाही. हा त्यांचा धुर्त दुटप्पीपणा
आहे. खरंच भ्रष्टाचार झाला असेल तर तो सिध्द करुन दाखवा असे अनेकवेळा त्यांना बजावले आहे. परंतु श्वानाचे शेपूट
कितीही प्रयत्न केला तरी वाकडे ते वाकडेच राहते त्यानुसार त्यांचे वर्तन सातारकरांना दिसत आहे.सर्वशक्तीमान असतानाही, यांच्याकडून, कासचे उघडयापाटाने येणारे पाणी कधीही बंदिस्त पाईपलाईनमधुन आणण्याचे काम झाले नाही किंवा त्यांना ते सुचले देखिल नाही. ते आम्ही करुन दाखवले केले. ग्रॅव्हीटीची कण्हेर उद्भव योजना आम्ही सुचवली परंतु हयांनी शहापूर योजना काढली.शहापूर योजनेचा ट्रायपार्टी करार एकदा नागरीकांनी पहावा म्हणजे यांचे खायचे आणि दाखवावयाचे दात कळून येतील. कचरा मुक्त सातारा किंवा कचराकुंडया मुक्त सातारा यांच्या कोणालाच जमला नाही ते आम्ही केले. नगरपरिषदेची कोंदट असणारी कार्यालयीन इमारत यांना कधीही नवीन करण्याचे सुचले नाही. ते आम्ही बिनपैशाची करोडो रुपयांची जागा उपलब्ध करुन केले आहे. प्रशासकीय इमारत उभारणेचे यांच्याकडून कधीही होणार नाही असे मोठे आणि महत्वाचे कार्य आता दृष्टीक्षेपात आणले आहे. यांना कधीही भुयारी गटार योजना सुचवता आली नाही. गरीबांच्या करीता घरकूल योजना राबवावी असे वाटले नाही.ती आम्ही राबविली. त्यांनी मात्र हातावरचे पोट असणा-या झोपडपट्टी वासियांना देशोधडीला लावण्याचे कसब चागले प्राप्त आहे.कासधरण पूर्ण क्षमतेने पाण्याने भरुन वाहु लागले त्यावेळी प्रथा परंपरेप्रमाणे एक निसर्गाशी कृतज्ञता म्हणून साविआने ओटीभरण केले. त्यामध्ये सत्ता आहे का नाही, प्रशासक आहे का असले प्रश्न आम्हाला पडले नाहीत. ते प्रश्न तुम्हाला पडले म्हणून तुमच्या दिडफुटी बगलबच्यांनी टिकात्मक ओरड सुरु केली. परंतु लगोलग दुस-या दिवशी जावून,तुमच्या नगरविकासआघाडीने कासचे ओटी भरण केले. मात्र त्याची कुठेही वाच्यता केली नाही. त्याचपध्दतीने आमचे उशिरा शहाणपण तुम्ही कबुल करताय, पाईपलाईनला मंजूरी आम्ही आणली असेही अप्रत्यक्ष मान्य करताय,आणि त्याचवेळी दोन वर्षापूर्वीच व्हायला पाहीजे होते तसेच प्रशासकांनी केले तुम्ही काम केले नाही असेही म्हणताय. अश्या प्रकारे दुहेरी भुमिका घेण्याची तुमची विचित्र पध्दत सातारकरांना नवीन नाही. आपणच कसे बादशहा, मसिहा किंवा एक्का आहोत अश्या अविर्भावात तुम्ही बागता. सातारकरांना याची सवय झाली आहे. सातारकरांच्या दृष्टीने तुमचे हे प्रकार म्हणजे शुध्द गाढवपणा आहे. तो गाढवपणा तुमचा तुम्हाला लखलाभ असो, अश्या शब्दात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
यांनी संबंधीतांना फटकारले आहे.







