नौदलाचा नवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा कायम देत राहील.

219
Adv

छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून स्वराज्यामध्ये नौदलाची निर्मिती केली. याच नौदलाचा नवा झेंडा छत्रपती
शिवरायांना समर्पित करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.ही बाब संपूर्ण देशाला छत्रपती शिवाजीमहाराजांच्या कार्याचा आणि शौर्याची प्रेरणा देणारी आहे. या नव्या झेंड्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. या निर्णयाबद्दल देशांचेराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण दलाचे आम्ही छत्रपती घराण्यांच्यावतीने तसेच समस्त देशवासियांच्यावतीने अभिनंदन करतो. हा नवा झेंडा संपूर्ण देशाला कायम प्रेरणा देत राहील अशी प्रतिक्रीया खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.

साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाचं महत्व ओळखून आरमार उभे केले. त्याचमुळे छत्रपती शिवाजी महाराजांना भारतच्या नौदलाचे जनक म्हटले जाते. नौदलाची स्थापना करून शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सिमांचे रक्षण करण्याची दूरदृष्टी ठेवली होती. संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका निर्माण केल्या. शिवाजी महाराजांपासूनच हीच प्रेरणा घेत देशाची पाहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या लढावू ताफ्यात सामील झाली आहे. केरळमधील कोचीन येथे ही नवी स्वदेशी बनावटीची युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे. ही बाब अभिमानास्पद आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

स्वराज्यात कोकणात ब्रिटीश, पोर्तुगीज आणि डच यांचाही प्रभाव होता. परकीयाच्या आक्रमकांना रोखण्यासाठी
महाराजांनी नौदलाची निर्मिती केली. मराठा साम्राजाचा विस्तार होत असताना शिवरायांनी सागरी सीमांचं रक्षण करण्यासाठी
शक्तीशाली आरमार उभं केलं. आजही भारतीय नौदल हा देशाच्या लष्करी सामर्थ्याचा महत्वाचा भाग आहे. देशाच्या सागरी सीमांचं रक्षण करण्यासाठी नौदलाची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी
महाराजांचा उल्लेख नौदलाचे निर्माते असा केला. ही बाब गौरवास्पद असल्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी
सांगितले.नौदलाच्या पूर्वीच्या झेंड्यावर दोन लाल रेषा होत्या. त्या लाल रेषा आता काढून टाकण्यात आल्या आहेत. ज्या
ब्रिटीशांच्या राजवटीपासून तशाच होत्या.आता मात्र नव्या झेड्यावर एका बाजूला भारताचा तिरंगा दिसणार आहे, तर
त्याच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेच्या आकारात नौदलाचं बोधचिन्ह दिसणार आहे. या नव्या झेंड्याची
प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांपासून घेवून ती प्रत्येक्षात साकारल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीर आभार
मानतो, असेही खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

Adv