आधीच पराभव दिसत असल्याने चोराच्या उलटया बोंबा सुरू आहेत

416
Adv

सातारा विकास आघाडीने मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जो वचननामा दिला होता त्यामधील सर्व कामे मार्गीलावण्यात यश मिळाले आहे. केलेल्या कामाचे जाहिर ऑर्ीट करणारी सातारा विकास आघाडी राज्यामध्ये एकमेव ठरली आहे. तरी सुध्दा स्वतः बाळयोध असल्याचे समजुन साविआ आणि आमच्यावर भ्रष्टाचार,कमिशन,टक्केवारी इत्यादी बाबतआरोप होत आहेत.भ्रष्टाचारामध्य आकंठ बुडालेल्या व्यक्तीने अशी ओरड करणे म्हणजे चोराच्या उलटया बोबा आहेत.नपा निवडणुका आधीच त्यांचा पराभव दिसत असल्याचे प्रथम वृत्तपत्रातुन पत्रकबाजी आणि नंतर इलेक्ट्रॉनिक संचारमाध्यमातुन आमची नाहक बदनामी करण्याचा प्रकार सुरु आहे असा पलटवार खा श्री छ उदयनराजे भोसले यांनी कोणाचेही नांव न घेता लगावलेला आहे. त्यांच्या बेलगाम आणि बिनबुडाच्या, बिनपुराव्याच्या आरोपांना उत्तर देणे आम्हाला प्रशस्त वाटत नव्हते परंतु एकदा दुध का दुध-पानी का पानी होवूनच जावून या विचारातुन हे प्रसिध्दीपत्रक देत आहे असे नमुद करुन खा श्री छ उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढ़्े नमुद केले आहे की, नागरीकांनी आम्हाला ज्या विश्वासाने
भरभरुन प्रेम दिले आहे त्या विश्वासाला तड़ा जावू न देता, सातारा नगरपरिषदेचा कार्यकाल अतिशय संयमाने चालवण्यात
आला. फक्त साविआच्याच नगरसेवकांची नाही तर सर्वच नगरसेवकांची कामे समयोचित प्रकारे मार्गी लावणेचे धोरण
स्विकारले होते. सगळे नगरसेवक सातारकरांच्या उपयुक्तच कामे सुचवितात ही धारणा त्या धोरणामध्य होती. त्यानुसार
सर्वच नगरसेवकांची विविध कामे समयोचित पध्दतीने मार्गी लावण्यात आली. त्याचप्रमाणे राज्य सरकार आणि केंद्रसरकार
कडून जास्तीत जास्त निरधी आणण्यात आला आहे.राज्याचे आणि कैंद्राचे स्वच्छ सर्वेक्षण अभियान, घरकल योजना, प्रधानमंत्री आवास योजना,अमृत योजना, वित्तआयोग या सर्व कैंद्राच्या योजना असून, त्यामधुन भरघोस निधी प्राप्त करुन घेण्यात आला आहे. सातारा विकास आघाडीच्या वचननाम्यातील कास धरण उंची वाढवणे,भुयारी गटर योजना, घनकचरा व्यवस्थापन, नवीन प्रशासकीय इमारत,ग्रेडसेपरेटर, आयुर्वेदिक गार्डन, शहरातील सर्व उद्यानांचे नुतनीकरण, जेष्ठ नागरीक भवन, घरकूल योजना, शहीद कर्नल संतोष महाडीक यांचे स्मारक,हदृदवाढ़ भागाकरीता सुरु करण्यात आलेली ०६ नवीन नागरी आरोम्य केंद्रे हे मुख्य मुदे मार्गी लागले आहेत. त्याच बरोबरीने दैनंदिन दिवा-बत्ती, रस्ते, पाणी, गटर्स इत्यादी सुविधांबाबत मोठया सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. पोवईनाका येथील श्री.छ.शिवरायांच्या पुतळयाचे नुतनीकरण करण्यात येत आहे. या सर्व बार्बीचा लेखाजोखा वेळ आल्यावर आम्ही विस्तृतपणे जनतेपुढ़े मांडणार आहोतच.

हे ज्यांचा वारसा सांगतात ते सर्व सत्ताधिश असतानाही त्यांनी कचरा उचलण्याच्या पध्दतीत सुधारणा केली नाही.वर्षोनुव्षे, कच-याने पुर्ण भरलेल्या कुडया आडव्या पाड़न, त्यातील व आजुबाजुचा कचरा खो-याने गोळा करुन नगरपरिषदेच्या गाडीमध्ये, डंपरमध्य कर्मचारी टाकत होते आणि तो वाहन नेला जात असे.आम्ही सर्वप्रथम सिमेंटच्या कोंडाळया ऐवजी लोखंडी कुंडया आणि त्या कुंडयाच क्हेक्यम यंत्रणेने गाडीमध्ये उचलुन घेवून थेट कचरा डेपोवर रिकाम्या करण्याची पध्दित राबविली, कालांतराने कुंडी मुक्त शहर ही संकल्पना राबविणेकरीता घरोघरी घंटागाडया सुरु केल्या.घंटागाडया सुरु करणारी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा नगरपरिषद ही पहिली नगरपालिका ठरली. हॉस्पिटल ओनर्स असोशिएशनच्या माध्यमातुन सर्वात घातक ठरणारा बायोमेडीकल वेस्ट गोळ्ा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबविली. त्यांच्या सहकार्यनि बायोमेडीकल वेस्ट प्लॅन्ट्साठी जागा देवून तो उभारला. कचरा शहरात साठच नये म्हणून सर्व उपाययोजना केल्या ज्या योजना यापूर्वी कधीही सर्वसत्ताधिश सत्ताधारी असताना केल्या गेल्या नाहीत. कच-याचे विलगीकरण करुन, त्यावर प्रक्रीया करण्याचा घनकचरा प्रकल्प सुरु केला. सातारा विकास आघाड़ी हे एक मोठे कुट्ंब आहे. सातारकर नागरीक, सातारा विकास आघाडीच्या कुट्ंबातील सदस्य आहेत. या सदस्यनागरीकांना दैनंदिन गरजा सक्षमपणे पुरवणे बाबतची काळजी आम्ही नेहमीच घेतली आहे. असे असताना कच – याबाबत, घंटागाडयांबाबत भ्रष्ट्ाचाराचे आरोप सुरु आहेत. ज्यावेळी हे आरोप करतात त्यावेळी पुराव्यानिशी बोलले पाहीजे. अन्यथा साविआची बदनामी करणे इतकाच प्रकार त्यांच्या कृतीतुन दिसत आहे. हा त्यांचा संकुचितस्वभाव आणि कर्मदरिद्रीपणाच म्हणावा लागेल अश्या शब्दात उदयनराजे भोसले यांनी फटकारले आहे

आम्ही यापूर्वीच समोर येण्याचे आव्हान अनेकवेळा दिले. परंतु त्यावेळी नसलेली शेपूट घालून, कधीही आमचे आव्हान यांनी स्विकारले नाही आणि आता नव्याने आव्हान देत आहेत. निधी किती आणला याबाबतचे त्यांचे आव्हान आम्ही नम्रपणे स्विकारतो, परंतु त्याकरीता गांधी मैदान येथे आमने सामने झाले पाहीजे. बेळ आणि तारीख दोघांच्या सोयीची असावी. आम्ही तयार आहोत कर नाही त्याला डर कश्याला पाहीजे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमुद केले आहे.

Adv