विलासपूर संभाजीनगर गोळीबार मैदान इंदिरानगर परिसरातील रोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने युवा नेते व उद्योजक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे समर्थक युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे यांनी पाऊल उचलले आहे त्यांनी या भागामध्ये रोजगार समन्वय केंद्र सुरू केले आहे
यासंदर्भात बोलताना संग्राम बर्गे म्हणाले युवा शक्ती फाउंडेशन यांच्या संपर्कामध्ये सातारा आणि परिसरातील काही कार्पोरेट कंपन्या आहेत या कंपन्यांना कुशल मनुष्यबळाची जरुरत आहे या कंपन्यांना सातारा आणि परिसरातील कुशल मनुष्यबळ मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही दुवा म्हणून प्रयत्न करणार आहोत या अनुषंगाने सातारा शहरातील कौशल्याधिष्ठित तरुणांनी आपले शैक्षणिक अर्हते ची कागदपत्रे 31 मे पर्यंत सादर करावेत
रोजगार समन्वय केंद्र गाळा क्रमांक 1 गजानन गार्डन विलासपूर सातारा या केंद्रावर इच्छुक तरुणांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे 9527599699 या मोबाईल क्रमांकावर इच्छुकांनी संपर्क साधावा असे संग्राम बर्गे यांनी कळवले आहे