किसनवीर कारखान्यासाठी अजितदादा यांच्याकडे किसनवीरच्या संचालकांची बैठक

597
Adv

सातारा दिनांक 13 किसनवीर सहकारी साखर कारखाना आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी प्रत्यक्ष हालचाली सुरू झाल्या आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शब्द दिल्याप्रमाणे शनिवारी मंत्रालयामध्ये किसनवीर सहकारी साखर कारखान्यांच्या संचालकांची बैठक घेऊन कारखान्याच्या प्रत्यक्ष अडचणी जाणून घेतल्या राज्य शासनाने राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून किसनवीर कारखान्याच्या आर्थिक देणी करिता मदत करावी अशी मागणी संचालक मंडळाच्या वतीने आमदार मकरंद पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील यांनी अजित दादांकडे केली

किसनवीर सहकारी साखर कारखान्यातील माजी आमदार मदन भोसले यांची सत्ता आमदार मकरंद पाटील यांनी उलथवून टाकली आहे कारखान्यात विजय जरी मिळाला तरी खऱ्या जबाबदारीला सुरुवात झाल्याने आमदार मकरंद पाटील यांनी त्या पद्धतीने हालचाल सुरू केली आहे मकरंद पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील आणि कारखान्याच्या संचालक मंडळाने शनिवारी मुंबईत मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेतली सुमारे सव्वा तास झालेल्या या बैठकीमध्ये दादांनी किसनवीर कारखान्याच्या सर्व अडचणी तपशीलवार जाणून घेतल्या कारखान्याची मूळ थकीत रक्कम थकीत देणी बंद पडलेल्या प्रकल्पांची परिस्थिती गाळप हंगाम तसेच खंडाळा सहकारी साखर कारखाना व प्रतापगड सहकारी साखर कारखाना यांच्यासाठी झालेला खर्च इतर अतिरिक्त देणे आणि लागू झालेले व्याज याची सविस्तर मांडणी या बैठकीत करण्यात आली ही सर्व आकडेवारी अजित पवार यांनी नोंदवून घेतली राज्य शासनाने सहकार क्षेत्रातील शिखर बँक असणाऱ्या राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक देणे इन करता मदत करावी तसेच 52 हजार शेतकऱ्यांची मालकी कारखान्यावर कायम राहावी या दोन मागण्या या बैठकीमध्ये प्रामुख्याने करण्यात आल्या अजित दादांनी या संदर्भामध्ये राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्जफेड करता कोणती सकारात्मक पावले उचलता येतील याची लवकरच चर्चा करून योग्य तो तोडगा काढू असे आश्वासन दिले किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या कर्जमुक्ती चा प्रवास लवकरच सुरू होईल अशी ग्वाही त्यांनी कारखान्याच्या संचालक मंडळाला दिली आहे

Adv