भाजप आमदार जयकुमार गोरे यांना तात्काळ अटक व्हावी यासाठी सातारा पोलीस अधिक्षकांची भेट घेणार.. महेश तपासे

626
Adv

मागासवर्गीय समाजातील मयत व्यक्ती पिराजी भिसे यांची खोटी कागदपत्रे बनवून जमीन लाटण्याचा प्रकार माण – खटावचे भाजप आमदार Jaykumar Gore यांनी केला. याच पार्श्वभूमीवर, त्यांना तात्काळ अटक करावी यासाठी, सोमवार दि. २ मे २०२२ रोजी मी माझ्या सहकऱ्यांसह सातारा जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेणार असलयाची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधामध्ये दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल आहे. त्यामुळे जयकुमार गोरे यांना तात्काळ अटक व्हावी व एकंदरीत मागासवर्गीय समाजाला न्याय मिळावा यासाठी सातारा जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन त्यांना आम्ही निवेदन दिणार आहोत.

भाजपा आमदार जयकुमार गोरे यांच्या या कृत्यामुळे एकंदरीतच भाजपाचा मनुवादी चेहरा जनतेसमोर आलेला आहे. भाजपशासित राज्यांमध्ये दलित आदिवासी व मागासवर्गीयांवर अत्याचार वाढत चालले आहेत, हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु अशा प्रकारचा अत्याचार महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना आम्ही कदापी होऊ देणार नाही.

नुकताच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री ना. Ajit Pawar दादा यांनी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व महामंडळांना भरघोस निधी देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आम्ही मागासवर्गीयांवर कुठल्याच प्रकारचा अत्याचार होऊ देणार नाही, असा आमचा निर्धार आहे.

सातारा एसपींच्या या भेटीवेळी जिल्ह्यातील स्थानिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच मागासवर्गीय समाजातील काही स्थानिक नेतेही उपस्थित असतील.

Adv