राधिका चौक ते कोटेश्वर मंदिर कॉलेजच्या रस्त्यावर 50 फुट हार व शुभेच्छांचे बुके चक्क रस्त्यावर

698
Adv

राधिका चौक लगत असणाऱ्या कॉलेजच्या कोपऱ्या वरती चक्क 50 फुटी हार व बुके घंटागाडीत टाकण्याऐवजी चक्क रस्त्यावर टाकून देण्याचा बेशिस्तपणा कोणी दाखवला आहे याचा जावई शोध घेणं गरजेचे आहे

राजकीय नेत्यांवर कार्यकर्त्यांची असणारी निष्ठा ही उत्सवी स्वरूपाची आणि प्रासंगिक असते सध्या या वाक्याला सातारा शहरांमध्ये फेरफटका मारला असता सहाजिकच बळ मिळत आहे स्वच्छ सातारा सुंदर सातारा आपणच सातारकर नारा देतो मात्र तो अमलात आणताना कोणताही सातारकर दिसत नाही दुसरीकडे 50 फुटी हार व शुभेच्छा देणाऱ्या बुके यांचा खच या रस्त्यावर पडलेला दिसून आला त्यामुळे स्वच्छता आपण पाहिली करावी म इतर लोकांना करण्यास सांगावी अशी प्रतिक्रिया रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी संबंधित कचरा टाकणाऱ्यां नागरिकांत बाबत व्यक्त केली

पालिकेची आरोग्य यंत्रणा कुठे?

उद्या नवीन वर्षाचा पहिला सण गुढीपाडवा या सणानिमित्त तरी आरोग्य विभागाने आपली स्वच्छता मोहीम राबवणे गरजेचे होते मात्र तसे न झाल्याने हा कचरा तसाच राहिला असल्याचे दिसून येते याला आरोग्य यंत्रणाही जबाबदार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले

Adv