सहकारी संस्था या सभासद जनतेच्या सर्वांगिण विकासाकरीता स्थापन केल्या जातात. सभासदांचे जीवनमान उंचावणे हे सहकाराचे मुलतत्व किंवा गाभा आहे.
सहकार तत्वांना तिलांजली देत, महाराष्ट्रात काही सहकारी संस्थां कश्या गिळंकृत केल्या गेल्या याविषयी वस्तुस्थिती मांडली. जे प्रकार घडले आहेत त्याची आम्ही फक्त जाहिर वाच्यता केली. या वाच्यतेमध्ये कोणत्याच आमदारांचे किंवा कोणत्या कारखान्याचा नामोल्लेख आम्ही केलेला नव्हता. तथापि खाई त्याला खवखवे या उक्तीप्रमाणे, त्यांच्याच मनात खोट आहे म्हणूनच त्यांनी गरळ ओकली.
आपल्या राज्यात, देशात सहकारी तत्वावर स्थापन झालेल्या संस्था कश्या मोडीत काढल्या गेल्या आहेत हे सर्वांच्या समोर आहे. सहकारी संस्थांतील सभासद मालक सभासद असुनही, स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापाटी त्यांची कशी कामगार-मजूराप्रमाणे पिळवणुक केली जाते याचीही अनेक उदाहरणे आहेत. अशा सहकारी संस्थांतील भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढणार, सहकारी संस्थांच्या सभासद जे खरे मालक आहेत, त्यांनी आपल्या मालकी अधिकारांचा वेळीच वापर करुन, अश्या स्वाहाकारी आणि स्वार्थी विचारधारेच्या व्यक्तींकडून संस्था खाजगीकरण होण्यापूर्वी सभासदांनी ताब्यात घ्याव्यात असे सर्वसाधारण बक्तव्य केले होते.
आमचे ते वक्तव्य फक्त आणि फक्त यांनाच झोंबले. वास्तविक आमच्या सर्वसाधारण भाष्यावर त्यांनी इतकी आगपाखड करण्याचे कारण नव्हते. ते अगदी व्यक्तीगत बाबींवरही घसरल्याचे पहायला मिळाले. वय वाढले की बुध्दी भ्रष्ट होते अशी अजब संकल्पना मांडली. त्यांनी त्यांच्या पेक्षा सर्वच जेष्ठ असणा-यांच्या बाबतीत त्यांची असलेली वैचारिक दिवाळखोरी
याव्दारे दाखवून दिली. कदाचित मानसिक संतुलन तात्पूरते का होईना त्यांचे बीघडले असावे. वाढत्या वयाप्रमाणे प्रगल्भता
वाढण्याऐवजी बालीशपणाच वाढला असल्याने दुखः वाटते.
कदाचित त्यांनी भ्रष्टाचार करुन मोडकळीत काढलेल्या जनतेच्या अनेक सहकारी संस्था आणि जनतेच्या कारखान्यात केलेला भ्रष्ट कारभार यांना शांत बसू देत नसावा म्हणूनच इतका आगपाखड ते करीत आहते. तुमच्याबाबतीत काहीच कोण बोलले नाही तर बुडाला आग लागण्याचे कारणच नव्हते. त्यांच्या एकंदरीत वक्तव्यावरुन निश्चितच दाल मे कुछ काला हैं हे सिध्द झाले आहे. आता यांनी पदाच्या जोरावर दबवून ठेवलेल्या मालक सभासदांनीच, स्वतःला न्याय मिळवण्यासाठी यांचा समाचार घ्यावा.
ग्रेड सेपरेटरचे काम आम्ही पूर्ण केले हे त्यांच्या तोंडाने सांगीतले ते एक बरे झाले. सातारा शहराची पुढील २०-२५ वर्षांची वाहतुक लक्षात घेवून, ग्रेडसेपरेटरचे काम आम्ही केले आहे. यापाठीमागे दुरदृष्टी आहे. संकुचित दृष्टीच्या व्यक्तींना त्याचे आकलन होणारे नाही. आज सुध्दा सातारा शहरातील वाहन किंवा गोडोलीकडून येणारी वाहन किंवा बसेस या मार्गातुन स्टॅन्डकडे जात आहेत. स्टॅन्डकडून गोडोली आणि जिल्हापरिषद या मार्गाचाही चांगला वापर होत आहे. पुढील काळात योग्य ती खबरदारी घेवून, ग्रेडसेपरेटर मधुन दुहेरी वाहतुक सुरु करण्याचे नियोजन आहे. यापाठीमागे लाकांची सोय ही लोकहिताची भुमिका आहे. शिवतीर्थावरची कोंडी संपूष्टात आली आहे. श्रेय घेण्याचा त्यांचा हावरटपणा सातारकरांना नवीन नाही.
ग्रेडसेपरेटरचे श्रेय मिळाले नाही म्हणूनच आमदारांचा जळफळाट होत आहे त्यांच्या ग्रेडसेपरेटरच्या कोल्हेकुईमुळे त्यांना थोडंतरी समाधान मिळत असावे.तसेच भ्रष्टाचा-यांनी नगरपरिषदेच्या भ्रष्टाचारावर बोलणं चोरांच्या उलट्या बोंबा आहे त्यात तथ्य काही नाही.
व्यक्तीगत किंवा संस्थेचे असे कोणतेही नांव घेतले नसताना, त्यांनी आपल्या अंगावर ओढवून घेतले आहे. याचाच दुसरा अर्थ दाल मे कुछ काला नव्हे तर शायद सबकुछ काला है हे सातारकरांच्या लक्षात आले आहे. त्यांची आगपाखड, कोल्हेकुई, गरळ त्यांची त्यांना लखलाभ असो. काहीही झाले तरी यांच्याकडून दबवल्या गेलेल्या आणि , पिचवलेल्या गेलेल्या
जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम एक समाजसेवक म्हणून आम्ही करून देणार आहे. तसेच यापुढील त्यांच्या बालीश वक्तव्याची दखल घेणे आम्हाला प्रशस्त वाटत नाही. तथापि झालेल्या केलेल्या भ्रष्टाचाराबाबत सरळ जनतेपुढेच आम्ही सत्य मांडू.





