संग्राम बर्गे मित्र समूहाच्या मोफत रुग्णवाहिकेचे शानदार लोकार्पण

324
Adv

खासदार श्री छ उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार त्यांचे समर्थक व विलासपूर व गोळीबार मैदान परिसरातील यशस्वी उद्योजक संग्राम बर्गे यांनी या परिसरातील नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिका सुरू केली आहे या उपक्रमाचे नुकतेच खा श्री छ उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले .

सातारा शहराच्या हद्दवाढीनंतर खासदार श्री छ उदयनराजे भोसले यांच्या आदेशानुसार विलासपुर आणि परिसरातील नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी वचनबद्ध राहण्याचे धोरण सत्ताधारी सातारा विकास आघाडीने ठेवले आहे . या भागातील नागरिकांना विशेषता ज्येष्ठ नागरिकांना तातडीने उपचार उपलब्ध व्हावेत याकरिता संग्राम बर्गे यांच्या संकल्पनेतून रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे .या रुग्णवाहिके मध्ये तातडीची आपत्कालीन ऑक्सिजन सुविधा असुन या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा श्री छ उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला रुग्णवाहिका सेवा सुरु केल्याबद्दल श्री छ उदयनराजे यांनी संग्राम बर्गे यांचे विशेषत्वाने कौतुक केले

विलासपूर सारख्या उपनगरां मधून सातारा शहरात येण्याकरिता या सेवेचा निश्चितच ज्येष्ठ नागरिकांना उपयोग होईल त्यामुळे या सेवेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे या सेवेचा गोळीबार मैदान रामराव पवार नगर विलासपूर इंदिरा वसाहत इत्यादी भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे ज्येष्ठ नागरिकांच्या उपचारासाठी हेल्थ कार्ड ची सोय करण्यात आली आहे इच्छुकांनी गाळा क्रमांक 1 गजानन गार्डन आपारमेंट कारंजकर नगर विलासपूर येथे संपर्क साधावा असे आवाहन संग्राम बर्गे मित्र समूहाच्या वतीने करण्यात आले आहे

Adv