प्रत्येक महिला ही मानसिक दृष्ट्या खंबीर असते तिच्या कर्तुत्वाला चौकटीत बांधण्याचा प्रयत्न होऊ नये .उलट तिला उंच भरारी घेण्यासाठी मोकळे आकाश मिळायला हवे महिलांची प्रगती समाजाच्या उच्च संस्कृतीचे निदर्शक असते मी सुद्धा साताऱ्यात राजकारणात नाही तर समाजकारणात सक्रिय राहणार आहे आई-वडिलांकडून समाजकारणाचे जे संस्कार मिळाले त्याचाच वारसा हा अदालत वाडा पुढे नेणार आहे असे स्पष्ट प्रतिपादन साताऱ्याचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या कन्या श्रीमंत छत्रपती वृषाली राजे भोसले यांनी केले आहे .
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर वृषाली राजे यांनी प्रसारमाध्यमांची मनमोकळा संवाद साधला त्यावेळी साताऱ्याच्या समाजकारणात सक्रिय होण्याचा त्यांचा विचार आणि आजच्या महिलेला स्वकर्तृत्व गाजवण्या करता कशाची गरज आहे यावर त्यांनी आपली मनमोकळी मते मांडली येथील श्रीमंत छत्रपती शाहू मंडळच्या विश्वस्त असणाऱ्या वृषालीराजे यांनी साताऱ्याच्या समाजकारणात सक्रीय झाल्या आहेत . 24 फेब्रुवारी 2022 या संस्थेमार्फत त्यांनी लसीकरण आणि रक्तदान शिबिर आयोजित केले होते. तसेच वेगवेगळ्या क्रीडा आणि सामाजिक उपक्रमातही त्यांचा सातत्याने सहभाग घेतला आहे . श्रीमंत छत्रपती प्रताप सिंह महाराज सेवा धाम संस्थेच्या त्या अध्यक्षा आहेत . या संस्थेच्या वतीने 12 मार्च रोजी विश्व अग्निहोत्र दिवस साजरा केला जातो . या कार्यक्रमात अग्निहोत्र चे महत्व सांगितले जाते . हा सर्व कार्यक्रम वृषालीराजे यांच्या अध्यक्षतेखाली होतो . संस्थेच्या वतीने सामाजिक शैक्षणिक व वैद्यकीय उपक्रम राबविले जातात .
वृषाली राजे पुढे म्हणतात , “महिलांचे कर्तृत्व आणि दातृत्व हे महान आहे .पुरुष प्रधान संस्कृती मध्ये त्यांना कायमच दुय्यम ठरविण्याचा प्रयत्न झाला तरीसुद्धा महिलांनी त्यांची उंची गाठून महिला सक्षमीकरण काय आहे हे दाखवले आहे .इतिहासामध्ये राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, राणी चन्नम्मा, पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर अशी कितीतरी उदाहरणे घेता येतील साताऱ्याच्या सामाजिक-आर्थिक क्रीडा क्षेत्रातही महिलांची नावे झपाट्याने पुढे येत आहेत त्यामुळे येथील मातीला पुरोगामी विचारांचा जो संस्कार आहे तो कायमच महिला सक्षमीकरणासाठी प्रेरणादायी आहे . छत्रपती शिवरायांनी सुद्धा त्यांच्या राज्य कारभारामध्ये आपल्या कृतीतून स्त्री दाक्षिण्य काय असते याचे दाखले दिले होते . छत्रपती शाहू महाराज छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या काळातही अनेक लढवय्या महिलांनी इतिहास गाजवल्या ची उदाहरणे आहेत जर येथील मातीलाच स्त्री सक्षमीकरणाचा संस्कार असेल तर त्या विचारांचे आपण पाईक आहोत हे विसरता कामा नये . आमच्या आजी पुण्यशील राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्रा राजे भोसले मातोश्री श्रीमंत छत्रपती चंद्रलेखा राजे भोसले व यांनीसुद्धा आम्हाला वेळोवेळी सामाजिक कार्यात पुढे सक्रिय राहण्यासाठी प्रेरणा दिली नव्हे तर तसा संस्कारही दिला त्यामुळेच तो वारसा घेऊन आम्ही समाज कारणासाठीच सक्रिय राहणार आहोत . विविध उपक्रमांच्या माध्यमातून हे काम कोणताही गाजावाजा न करता अखंडपणे सुरू आहे . याचा कोणताही संबंध राजकारणाशी नाही आणि तो कोणी जोडण्याचा प्रयत्नही करू नये .साताऱ्याच्या ऐतिहासिक अदालत वाड्याला समाजकारणाचा मोठा वारसा आहे येथील वाड्याचे दरवाजे सर्वसामान्य सातारकरांच्या साठी कायमच खुले आहेत . नागरिकांच्या समस्या सोडविणे हे आद्य कर्तव्य आहे आणि आम्ही सातारकर म्हणून या समस्या सोडवण्यासाठी बांधील आहोत . साताऱ्यात सामाजिक वर्तुळामध्ये यापूर्वीही आम्ही सक्रिय होतो आणि राहणार आहोत असे वृषाली राजे म्हणाल्या .
वृषालीराजे यांनी शिवतेज माध्यमिक विद्यालय यासाठी मोठे योगदान दिले श्रीमंत छत्रपती चंद्रलेखा राजे भोसले यांच्या स्मरणार्थ दोन किलो वॅट क्षमतेची सोलर सिस्टिम भेट दिली विद्यालयांमध्ये बॉटनिकल गार्डन व परिसर सुशोभीकरणासाठी सक्रिय आर्थिक मदत केली प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या मिष्टान्नाचे वाटप करण्यात आले संगणक कक्ष व ग्रंथालय परिसरासाठी सुद्धा मोठी मदत त्यांनी केली सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वृषालीराजे उपाध्यक्ष असून या खेळासाठी जागा उपलब्ध करून देणे आहेत व छ् शाहू क्रीडा संकुलाच्या संदर्भात कर कमी करणे या विषयांवर वृषाली राजे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व जिल्हाधिकारी शेखरसिंह यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली . सातारा आणि येथील परंपरा हा आमचा भावनिक संस्कार आहे आणि या ऐतिहासिक नगरीच्या विकासासाठी आम्ही कोठेही कमी पडणार नाही त्याकरिता वाटेल ते प्रयत्न करू असे स्पष्ट आश्वासन वृषालीराजे भोसले यांनी महिला दिनाच्या दिवशी सातारानामाशी बोलताना केले