
सध्या ग्लोबल वार्मिंगचे दुष्परिणाम आपण पहातोच आहे. शेतकऱयांना शेतीमध्ये उत्पन घेताना पिकांवर वेगवेगळे रोग पडतात. त्यामध्ये ऊस असेल आल असेल हळद असेल यासह सर्वच पिकांचे उत्पन्न घटते आहे. त्याकरता जिल्हा बँक आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल वॉर्मिंग या परिसंवादाचे आयोजन आयोजन रविवार दि. 20 रोजी जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या परिसंवादाचे उद्घाटन राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी दिली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, पाटणचे सत्यजितसिंसह पाटणकर, जिल्हा बँकेचे संचालक शिवरुपराजे खर्डेकर, संचालिका कांचन साळुंखे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देताना नितीन पाटील म्हणाले, हवेचे, पाण्याचे प्रदुषणाचे दुष्परिणाम आपण पहाताच आहात. ग्लोबल वॉर्मिंगचा धोका जास्तीकरुन शेती व शेतीपूरक उद्योगांना होत आहे. शेतकऱयांना शेतीमध्ये पिक घेताना ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसतो आहे. शेतकऱयांच्या हितासाठी त्यांना मार्गदर्शन म्हणून ग्लोबल वॉर्मिंग या परिसंवादाचे आयोजन रविवार दि. 20 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा बँकेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे. या परिसंवादाचे उद्घाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱहे, राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण, आमदार शिवेंद्रराजे, आमदार मकरंद पाटील, लायन्स क्लबचे प्रांतपाल सुनील सुतार, सीने अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, कामधेनु विद्यापीठ गांधीनगरचे मदनगोपाल वार्षणेय, पर्यावरण तज्ञ डॉ. गुरुदास नुलकर, डॉ. अविनाश कदम हे प्रत्यक्ष तर पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, अभिनेता सयाजी शिंदे, अमिर खान हे ऑनलाईन उपस्थित रहाणार आहेत, असे त्यांनी सांगितले. डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, जिह्यात पर्यावरणाच्या दृष्टीने जिल्हा र्बॅक अनेक उपक्रम राबवत आहे. आगामी काळात जिह्यातील 954 विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून गावागावात झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.







