मृद व जलसंधारण चे अधिकारी मिस्टर इंडिया च्या भूमिकेत पालकमंत्री व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

632
Adv

सातारा जिल्ह्यातील मृद जलसंधारणाचे अधिकारी हे आपल्या जागेवर कधीच नसतात आवो जावो घर तुम्हारा अशा अविर्भावात वावरत असून पालकमंत्री बाळासाहेब पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यात लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे

मृद व जलसंधारण या खात्याची वाई ,फलटण ,कराड येथे ऑफिस असून या ऑफिसमध्ये अधिकारी हे कधीच उपलब्ध नसतात याप्रकरणी बऱ्याच तक्रारी झाल्या आहेत मात्र याप्रकरणी ना पालकमंत्री ,जिल्हाधिकारी साहेब कोणीही लक्ष न घातल्याने या खात्याचे अधिकारी मात्र सुसाट सुटल्याचे दिसून येते वाई येथील ऑफिस मध्ये पवार नामक अधिकारी यांच्याकडे काही नागरी केले असता ते उपलब्ध नव्हते तेथील कर्मचारी निवांत खुर्चीवर बसून टेबलवर पाय ठेवून झोपलेल्या अवस्थेत दिसून आले अशी या खात्याची अवस्था झालेली दिसत असून जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी या खात्याकडे गंभीरपणे बघावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे

या खात्याने जिल्ह्यात किती बंधारे बांधले त्याची माहिती ही या खात्याकडे नसून कोट्यावधींची बिले मात्र या खात्यामार्फत निघाली असून मोठा घोटाळा या विभागात झाला की काय अशी पाल मनात चुकचुकल्या शिवाय राहणार नाही या खात्याला अधिकारी परगावी चे आहेत सोमवार व गुरुवार ते मनात आले तर ऑफिसमध्ये बसून पाच मिनिटांची हजेरी लावून परत मिस्टर इंडिया च्या भूमिकेत राहून गायब होतात त्यामुळे या खात्याची अवस्था मृद झाल्यासारखी दिसून येते

Adv