निष्ठावंत सत्यजित पाटणकर सरकारांना चेअरमन पदाचा मान मिळणार का याकडे जिल्ह्याचे लक्ष?

477
Adv

राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांचा पराभव करून सत्यजित पाटणकर हे जिल्हा मध्यवर्ती बँकेत निवडून आले असून बँकेच्या चेअरमन पदासाठी सहा डिसेंबरला चेअरमन निवड होणार आहे राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर यांना पक्ष चेअरमन करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे का सत्यजित पाटणकर यांनाही माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या सारखेच गप्प बसवणार ?या पक्षाच्या भुमीकडे सर्वांचे लक्ष लागले असून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्यावर बँकेच्या चेअरमन पदाबाबत अन्याय झाला असून पक्षाने तो आता दूर करावा अशी अपेक्षा जनतेतून होत आहे

पक्ष नेतृत्वाने पक्ष वाढीचा विचार करावा

पाटण तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद कमी होत असून वाई मतदारसंघाला जसे आत्ता जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले आहे तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्षपद पाटण मतदार संघाला मिळाले तर पक्षाचीच यातून ताकद वाढणार आहे पक्ष नेतृत्व जिल्हा बँकेच्या चेअरमन पदाबाबत काय निर्णय घेते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले

वाई सोसायटी मतदार संघातून बिनविरोध निवडून आलेले आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील हेच अध्यक्ष व्हावेत या मागणीसाठी कोरेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मागणी केली. तर वाई तालुक्यातील काही गावांनीही नितीन पाटील यांनाच अध्यक्षपद द्यावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे बँकेचा चेअरमन कोण होणार याकडेच लक्ष लागून राहिले आहे.

जिल्हा बँकेच्या चेअरमन पदासाठी 6 डिसेंबर ला चेअरमन निवड होणार असून इच्छुकानी यासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याचे समोर येत आहे. यामध्ये जिल्ह्यात चेअरमन पदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे ते प्रथमच संचालक झालेले सत्यजित पाटणकर व नितीन पाटील ,जिल्हा बँकेमध्ये माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर हे गेले काही वर्ष संचालक होते त्यांनी मात्र कधी आपल्याला चेअरमन करा म्हणून कधीही पक्ष नेतृत्वाकडे आग्रह धरला नाही शांत संयमी असलेल्या पाटणकर सरकारांना चेअरमन पदाचा मान सत्यजित पाटणकर यांच्या रूपाने मिळणार का याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे, मनात आणलं असतं तर कधीही माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले असते आता मात्र पक्षानेच सत्यजित पाटणकर यांना चेअरमन केले तर राष्ट्रवादीची ताकत पाटण तालुक्यात वाढेल हे नक्कीच

Adv