इनोव्हेटिव साताऱ्यावर श्री छ उदयनराजे साधणार तरूणाईशी संवाद

364
Adv

साता-यात बरच काही आहे. बरंच काही नाही, जे नाही ते कसं निर्माण करायचं आणि जे आहे त्यामधुन सार्वजनिक युबाहित कसं साधायचं या दोन्ही बाबत विचारमंथ होणे आवश्यक आहे. विचार मंथनाची सुरुवात संवादाने होते, म्हणूनच राजकारणातले सगळे अभिनिवेश बाजुला ठेवुन,आपला सातारा सर्वांगसुंदर करप्प्यासाठी तुमचं आम्ही ऐकणार आहे, तुमच्याशी बोलणार आहे.या करीताच आम्ही हितगुजकरप्यासाठी वेळ राखुन ठेवला आहे. राईट स्टैन्डर्ड टाईगला येणारही आहे.
आपणही वेळात वेळ काढुन जरुर या, चांगल काहीतरी समन्वयातुन घडवण्याचा किंवा घडवुन आणण्याचा सकरात्मक प्रयत्न करूया असे आवाहन खा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील तरुण युबक अर्गाला केलं आहे. रविवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँन्केच्या सभागृहात, इनोव्हेटीव्ह साताराच्या निमित्ताने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे युबक बर्गाशी संवाद साधणार आहे.

हा संवाद कार्यक्रम सर्वांना खुला आहे.बहुतेकवेळा आपण सर्वजण आपल्या साता-यातजेकाही नाही त्याबद्दल चार चौघात चौकाचौकात, व्हॉटस अप मेसेजबर बोलत असतो. परंतु त्यावेळी आपल्याकडे जे आहे त्याचा विचार आपण साहजिकच करत नाही असे नमुद करुन खा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की,निसर्गाने वरदान दिलेल्या साता-याचे वातावरण अत्यंत चांगले मानले जाते.जिल्ह्यात दोन मोठी रेल्वे स्टेशन्स आहेत या ठिकाणी सर्व प्रकारच्या गाड्या थांबतात आणि जबळजबळ भारतात कुठेही जाता येवू शकेल अश्या रेल्वेगाड्या आणि त्यांची पुरेशी संख्या मुंबई-पुणे-चेंगलोर या महानगरांना जोडणारा (गोल्डन क्वाडरेंगल) राष्ट्रीय महामार्ग सातारा जिल्हयातुन सुमारे १५० किलोमीटरचा जातो त्यामुळे साता-याची कनेक्टीव्हीटी चांगली आहे. उद्योग उभारणीसाठी किंवाआयटी पार्कसाठी पुण्या-मुंबईच्या तुलनेने येथील दर गगनाला भिडलेले नाहीत. अकुशल आणि कुशल असे दोन्ही प्रकारचे सेवकवर्ग उपलब्ध आहे. तारांकित एमआयडीसी होत आहे. तासवडे, सातायातील दोन, शिरवळ-लोणंद असे मोठे इंन्डस्ट्रीयल एरिया अस्तित्वात आहेत. रयत सारखी मोठी शैक्षणिक संस्था आपल्या कडे आहे. कोल्हापूरच्या स्वामी विवेकानंद संस्थेचे आणि रयत संस्थेचे सातारा जिल्हयात शैक्षणिक जाळे आहे.कोणता अभ्यासक्रम सातारा जिल्ह्यात नाही असे नाही.जागतिक स्तरावरील शिक्षण या आणि अश्या अनेक संस्थांच्या माध्यमातुन तुलनेने ब-याच कमी खर्चात आपल्या जिल्ह्यात उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील अकरा धरणांचा आणि एकमेव हिलस्टेशन असलेला सातारा जिल्हा आहे. आपलाच जिल्हा महाराष्ट्र राज्याची बहुतांशी बीजेची गरज कोयनेच्या हायड्रोप्रोजेक्टच्या माध्यमातुन पुरी करीत आहे. परंतु ब-याच वेळा आपल्याकडे जे काही आहे त्याची
किंमत आपल्याला नसते पण दुस-याला असते, पिकत तिथे विकतं कुठे? ते खरंच आहे.तथापि या ठिकाणी पर्यटनाला मोठा वाव देणे आवश्यक आहे. आयटी हब नाही ही एक
कमतरता आजच्या आणि येणा-या १०-२० वर्षात जाणवणारी आहे. सातारच्या दोन्ही एमआयडीसीत मोठ्या कंपन्या असणं हे ही अत्यावश्यक आहे. कारखानदारी, उद्योग-व्यवसाय,पर्यटन इ घटकांच्या वाढीला अधिक पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. सातारची एमआयडीसी सन १९७८ मध्ये
स्थापन झाली. त्याचवेळी नगरची सुध्दा झाली. नगरची पुढे गेली, असे का झालं याचा विचार करायचा नाही. आता एक नवा दृष्टीकोन, नबी आकांक्षा आणि जिद्द घेवुन आपल्याला एकमेकांशी संवाद साधुन समन्वयातुन युवकांसाठी काही चांगलं घडवायचं आहे. अधिक काही सांगण्यापेक्षा दिनांक १७ रोजी सकाळी १०.०० वाजता आपण सातारच्या डि.सी.सी बँन्केच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात यावे म्हणजे पाहिजे तेवढं परंतु मुद्याचे आणि युवाहिताचे बोलू. एक नेता म्हणून नव्हे तर एक सहकारी, कार्यकर्ता म्हणून आपण संवाद साधु असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकात शेवटी नमुद केले आहे.

Adv