सातारा शहर व शाहू नगर या दोन भागांना जोडणाऱ्या चार भिंती परिसराची उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या पुढाकाराने पुन्हा शनिवारी स्वच्छता करण्यात आली . या स्वच्छता मोहिमेत तब्बल तीन टिपर कचरा गोळा करण्यात आला .
चार भिंती स्मारक ते मंगळाई कॉलनी कोपरा या दरम्यानचा सगळा कचरा झाडून साफ करण्यात आला . शनिवारची साप्ताहिक सुट्टी असली तरी धडक कामाची ख्याती असलेले उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी आरोग्य विभागाला सोबतीला घेत सफाई कर्मचाऱ्यांना मिशन चार भिंती ठरवून च दिले . आरोग्य विभाग प्रमुख प्रकाश राठोड, आरोग्य निरीक्षक सागर बडेकर आणि वीस सफाई कामगारांनी कोल्हाटी वस्ती ते चार भिंती स्मारक व तेथून मंगळाई कॉलनी कॉर्नर हा सर्व परिसर झाडून स्वच्छ केला . चार भिंती स्मारकाची सुद्धा यावेळी स्वच्छता करण्यात आली . अडीच तासाच्या स्वच्छता मोहिमेत तीन ते चार टीपर कचरा गोळा करून तो सोनगाव कचरा डेपोला पाठविण्यात आला .
चौकट-
शाहूनगर मध्ये नगराध्यक्षांनी सफाई मोहिम राबविली तर लगतच्या चार भिंती परिसरात उपनगराध्यक्षांनी तातडीने सफाई अभियान हाती घेतले घंटागाडीच्या नव्या व्यवस्थेत शाहूनगर व चारा भिंती जगताप वाडी, या भागांना सहा घंटागाड्या चार ट्रॅक्टर, व तीस सफाई कामगार कायमस्वरूपी देणार असून रस्त्यावर कोठेही कचरा पडू देणार नाही याची स्पष्ट खात्री उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली .