काही दिवसांपूर्वी केरळ पोलिसांनी नाशिकच्या भाई सह साताऱ्यातील पैलवान सचिन शेलार यांना चौकशी करता नेले होते याप्रकरणी केरळ पोलिसांकडून पैलवान सचिन शेलार यांच्यासह सह अन्य युवकांची नाहक बदनामी झाल्याचे दिसून आली याप्रकरणी केरळ पोलिसांबद्दल जिल्ह्यातील पैलवान ग्रुप यांनी नाराजी व्यक्त केली
केरळ सोने दरोडा प्रकरणी मुख्य संशयित आरोपी निखिल जोशी उर्फ भाई याच्यावर केरळ मध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल झाला असून संशयित म्हणून पैलवान सचिन शेलार व अन्य युवकांना केरळला नेले होते मात्र सर्व गोष्टींची पडताळणी केल्यानंतर पैलवान सचिन शेलार यांच्यासह अन्य युवकांचा काडी मात्र संबंध नसल्याचे दिसून आल्याने या प्रकरणी पैलवान सचिन शेलार यांच्यासह अन्य युवकांची नाहक बदनामी झाल्याचे दिसून येते
निखील जोशी ऊर्फ भाई याचे कारणामे हळूहळू एके एक समोर येऊ लागले आहेत यात नाहक बदनामी होते आहे ती संबंध नसणाऱ्या पैलवान सचिन शेलार यांच्या सारख्या साताऱ्यातील युवकांची त्यामुळे खरे आरोपी मोकाट असेच यावरून दिसून येते पोलिसांनी या प्रकरणी जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई जरूर करावी मात्र युवकांची नाहक बदनामी झाली तर नागरीकांचा पाहण्याचा दृष्टीकोण बदलत असून लवकरात लवकर याप्रकरणी खरेखुरे संबंध असणारे आरोपी पोलिसांनी पकडावे अशी अपेक्षा सातारकर नागरिकांनी व्यक्ती केली आहे