Monday, April 20, 2026
spot_img
Home Satara District Satara City शिवसंपर्क मोहीमे अगोदरच जिल्ह्यातील शिवसेना व संपर्कमंत्री संपर्क हिन

शिवसंपर्क मोहीमे अगोदरच जिल्ह्यातील शिवसेना व संपर्कमंत्री संपर्क हिन

474
Adv

सातारा जिल्ह्यात उद्या शिवसेनेचे शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ होणार असून या शुभारंभा अगोदरच जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व संपर्कमंत्रीच संपर्क हीन असल्याचे दिसून येते

शिवसेनेची सत्ता आल्यापासून जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी हे हवेत असुन त्यांना जनतेशी संवाद साधण्यात वेळ नसल्याचे दिसून येते याच्यावर शिवसेनेचे सातारा जिल्हा संपर्कमंत्री म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे जबाबदारी पक्षाने सोपवली असली तरी ते कायमच जिल्ह्याच्या बाहेर संपर्कही असतात त्यांनी जिल्ह्यातील शिवसेना वाढण्यासाठी काय प्रयत्न केले हे त्यांनाच माहिती

नरेंद्र पाटील ,संजय मोहिते ,हर्षद कदम यांनीच शिवसेना चालवली

सातारा जिल्हायातील शिवसेनेने जिल्ह्याला हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या रूपाने खासदार निवडून दिला होता व जावली मतदारसंघातून सदाशिराव सपकाळ यांच्या रूपाने आमदारही निवडून दिला होता त्यावेळेची शिवसेनाही सर्वसामान्य माणसात मिळून-मिसळून राहत होती नरेंद्र पाटील श्रीमंत फडतरे हे. जो पर्यंत शिवसेने मध्ये होते त्यावेळेस जिल्ह्यात शिवसेनेचे अस्तित्व टिकून होते आता सातारा जिल्ह्यात सेनेचे मंत्री आमदार असूनही शिवसेनेचे पदाधिकारी कुठेही दिसत नसल्याचे जाणवते

पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनीच आता सातारा जिल्ह्यात शिवसेना पदाधिकारी यांचे कान टोचावे अशी अपेक्षा सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून होत आहे

निखिल बानगुडे पाटील आहे तरी कुठे

नितीन बानगुडे पाटील यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता सुरुवातीच्या काळात आक्रमक पवित्रा घेत त्यांनीही सेना वाढवण्यासाठी प्रयत्न केले आता मात्र आमदार किच्या यादीत त्यांचे नाव आल्याने ते ही जवळपास सत्ता आल्यापासून सातारा जिल्ह्यात कुठेही शिवसेनेच्या माध्यमातून दिसत नाहीत

जिल्ह्यात किती जिल्हाप्रमुख आहेत हे कोणालाच माहिती नाही जो तो उठतो मी जिल्हाप्रमुख आहे अशा आविर्भावात नेत्यांच्या दौरा असला की पुढे पुढे करतो सातारा जिल्हाप्रमुख कोण आहे हेही जिल्ह्यातील तळागळातील लोकांना माहिती नसल्याचे दिसते त्यामुळे शिवसेनेने शिव संपर्क अभियान जरूर राबवावे मात्र जनतेशी ही संपर्कात रहावे अशी अपेक्षा जिल्ह्यातील शिवसैनिक व नागरिकांकडून होत आहे

Adv