जिल्हयात जादा लसीकरण केंद्र सुरु करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव. लवकरच लसीकरणाची सुविधा मिळणार

153
Adv

केंद्र शासनाने 1 में पासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. लोकसंख्येचा विचार करता सातारा शहरात सदरबझार, दगडीशाळेमध्ये आणी शाहुपूरी ग्रामपंचायत इमारत या ठिकाणी नवीन लसीकरण केंद्र सुरु करण्याबरोबरच जिल्हयातील नगरपालीका, नगरपंचायत आणी मोठ्या ग्रामपंचायतीच्या अधीकार क्षेत्रात नवीन लसीकरण केंद्र सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे प्रस्तावीत केले आहे. लवकरच नागरीकांना सुकर होईल अशी लसीकरणाची व्यवस्था केंद्र सरकारच्या माध्यमातुन करण्यात येईल.

सध्या कोरोनाने जगभरासह भारतामध्ये धैमान घातले आहे. सुदैवाने भारतीय बनावटीची लस उपलब्ध झाली असून, सर्व प्रथम जानेवारी महिन्यात कोरोना वर्कर्स व त्यानंतर 45 आणी त्यावरील वयोगटातील व्यक्तींना लसीकरण करण्यास प्राधान्य दिले होते.
आता केंद्राने 1 मे महाराष्ट्र आणी कामगार दिनापासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे लसीकरण करावयाची असलेली लोकसंख्या विचारात घेऊन, लसीकरण केंद्र सुध्दा वाढवावी लागणार आहेत. संपूर्ण जिल्हयातील नगरपालीका, नगरपंचायती मोठया ग्रामपंचायती इ. ठिकाणी नागरीक, ग्रामस्थ यांच्या सोयीसाठी नव्याने लसीकरण केंद्र सुरु करणेबाबत जिल्हाप्रशासन आणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे प्रस्तावीत केले आहे.सातारा शहरात सुरुवातीपासूनच नगरपालीकेच्या माध्यमातुन पूज्य कस्तुरबा आरोग्य केंद्र आणि गोडोली येथील श्री छ प्रतापसिंह महाराज उर्फ दादामहाराज आरोग्य केंद्रामध्ये सातारा शहर आणी
आसपासच्या उपनगरातील नागरीकांना दररोज सरासरी प्रत्येक केंद्रावर 300 व्यक्तींना मोफत लस दिली जात आहे. या केंद्रावर लसीकरण करुन घेण्यासाठी येणा-या नागरीकांची बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय तातडीच्या वैद्यकीय प्रथोमोपचाराची सोय आदी बाबींची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

लवकरच सातारा शहरातील सदरबझार येथील दगडी शाळा, आणी शाहुपुरी येथे ग्रामपंचायत इमारत या नवीन जादा ठिकाणांसह, संपूर्ण जिल्हयातील नगरपरिषदा, नगरपंचायत, मोठया ग्रामपंचायती येथे केंद्र सरकारच्या मंजूरीप्रमाणे नवीन लसीकरण केंद्र सुरु करुन, 18 वर्षावरील सर्व व्यक्तींच्या लसीकरणाची सुलभ व्यवस्था करण्यात येईल.

Adv