पेढ्याचा भैरोबा मंदिर परिसर व प्रभाग क्र-१ते 6 मधील बंद असलेले पथदिवे सुरू करा

320
Adv

शाहूपुरी चे उपसरपंच व लोकप्रिय नेते राजेंद्र गिरी गोसावी यांनी पेढ्याचा भैरोबा येथील पथदिवे व शाहूपुरीतील प्रभाग क्रमांक 1 ते 6 मधील दिवे त्वरित सुरू करावे या मागणीचे निवेदन उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्याकडे आज दिले आहे

राजेंद्र गिरी गोसावी हे विकास कामांसाठी कायम अग्रेसर असतात त्यांच्या विकास कामांमुळे त्यांची शाहूपुरी व गडकर आळी भागात लोकप्रियता वाढली असून कोरोना च्या काळात सुद्धा लोकप्रिय नेतृत्व राजेंद्र गिरी गोसावी विकास कामात कुठेही मागे पडताना दिसत नाही

सालाबाद प्रमाणे गडकर आळी येथील ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या श्री पेढ्याचा भैरोबा ची यात्रा दिनांक ३०/०४/२०२१ रोजी असून सदर परिसरामध्ये पायरी ते मंदिर कमीत कमी 35 ते 40 दिवे असून ते सध्या बंद स्थितीमध्ये आहेत.तरी सदर
दिवे हे येणाऱ्या यात्रेपूर्वी बसवून मिळावेत तसेच शाहुपुरी ग्रामपंचायत प्रभाग क्र १ ते 6 मध्ये बरेच ठिकाणी जुने किमान ७०-७६ सीएफएल बल्ब बंद अवस्थेत असून सदर ठिकाणी एलईडी लाईट बसवून मिळावी अशी मागणी उपसरपंच व शाहूपुरी चे नेते राजेंद्र गिरी गोसावी यांनी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

Adv