खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासत समाजकारण केले आहे.लिंब गावातील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी त्यांनी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याने रस्त्याचे काम मार्गी लागले असून आतापर्यंत खासदार उदयनराजे भोसले यांनी गावातील विकासकामांसाठी 70 लाख रुपयांचा निधी दिला असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गोसावी यांनी दिली.
लिंब गावातील रस्त्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या खासदार फंडातून 15 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाचा शुभारंभ सरपंच ऍड. अनिल सोनमळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी गोसावी बोलत होते.
बाळासाहेब गोसावी पुढे म्हणाले, मोठे गाव असल्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे कार्यकर्ते गावात असतात. हीच खरी लोकशाही आहे. मात्र, जेव्हा गावाच्या विकासाची गोष्ट येते तेव्हा राजकीय, वैचारिक मतभेद विसरुन सर्वांनी एकत्र येणे यातूनच विकास घडत असतो. खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील राजकारणापलिकडे जावून गावासाठी आतापर्यंत 70 लाख रुपयांचा निधी विकासकामांसाठी दिला आहे.
सध्या कोरोना संसर्गामुळे सर्व समाज एका संकटातून वाटचाल करत आहे. या संकटात देखील लिंब ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच ऍड. अनिल सोनमळे यांनी सर्वांना बरोबर घेवून एकदिलाने जे काम केले आहे ते उल्लेखनीय असल्याचे सांगून गोसावी यांनी ऍड. सोनमळे यांचे अभिनंदन केले. सर्वांनी कोरोनाचे नियम पाळून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन गोसावी यांनी केले. तसेच खा उदयनराजे भोसले यांनी रस्त्यासाठी निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने आभार व्यक्त केले.
यावेळी उमेश पाटील, राहुल पाटील, संदीप सोनमळे, अशोक करंजे, दिपक शिंदे, अमित पाटील, राजेश शेटे, जीवन सोनमळे, दत्ता वणवे, संतोष सावंत ,विशाल राजे, दिलीप सावंत, सुरेश जाधव, लहू सावंत, सुनिल जमदाडे, सुरेश सावंत, तुळशीराम सावंत, योगेश सोनमळे, दिलीप वंजारी, लक्ष्मण मापारी, रविंद्र काबंळे, किर्तीकुमार तारू, हणमंत करंजे, नाना निकम, दत्ता गिरी, बाबु खादगे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.