छ.उदयनराजे यांच्या सहकार्याने शाहूपुरीत विविध विकास कामे मार्गी .उपसरपंच राजेंद गिरीगोसावी

344
Adv

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सहकार्याने शाहूपुरी भागात विविध विकास कामे मार्गी लागल्याने शाहूपुरी येथील नागरिक समाधान व्यक्त करत असल्याचे लोकप्रिय नेते उपसरपंच राजेंद्र गिरीगोसावी यांनी सांगितले

नुकत्याच झालेल्या हद्दवाडीत शाहूपुरीचा भाग हा सातारा शहरात समाविष्ट झाला आहे शाहूपुरी हा भाग शहरात नव्हता तेव्हाही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदार फंडातून विविध विकास कामे मार्गी लावली असून शाहूपुरी करांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न, रस्ते लाईट आदी समस्यांवरती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे बारीक लक्ष असते त्यामुळेच शाहूपुरी येथील नागरिक त्यांच्या कामामुळे समाधानी असतात ,या पुढेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून शाहूपुरी भागा करता विविध कामे मंजूर करणार असल्याचे मत ही लोकप्रिय नेते उपसरपंच राजेंद्र गिरी गोसावी यांनी या वेळी सांगितले

येणाऱ्या काळात फकत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचेच नेतृत्व मानून जेवढा विकास शाहूपुरी भागा करता येईल तेवढा करणार असून जिथे जिथे अडचण येईल तिथे तिथे मी स्वतः जातीने उभा राहुन समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याची प्रतिक्रिया ही लोकप्रिय नेतृत्व व उपसरपंच राजेंद्र गिरी गोसावी यांनी सातारानामाशी बोलताना दिली

Adv