Monday, April 20, 2026
spot_img
Home Satara District जिल्ह्यातील रस्ते व विविध कामांसाठी अधिवेशनात निधीची तरतूद करावी छ उदयनराजे यांची...

जिल्ह्यातील रस्ते व विविध कामांसाठी अधिवेशनात निधीची तरतूद करावी छ उदयनराजे यांची मागणी

281
Adv

सातारा जिल्हा निसर्गसंपन्नतेने नटलेला महाराष्ट्रातील विषम पर्जन्यमान असलेला जिल्हा आहे. सातारा जिल्हयाचे ऐतिहासिक महत्व देखिल अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम सातारा जिल्हयाने यापूर्वी अनेक वेळा समर्थपणे केले आहे. समाजकारण, राजकारण याच्या पलिकडे जावून, पुरोगामी विचाराच्या जिल्हयाच्या भौगोलिक विषमतेमुळे अर्थसंकल्पामध्ये रस्त्यांच्या मजबुतीकरण,डांबरीकरण,दान्नती करीता भरीव तरतुद करावी अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोक चव्हाण यांचेकडे केली.

सातारा राज्याच्या राज्याचा अर्थसंकल्प मार्चच्या महिल्या आठवड्यात राज्याच्या विधीमंडळात सादर करण्यात येणार आहे. त्यामध्ये सातारच्या भौगोलिक सामाजिक आणि विषम परिस्थितीचा विचार करुन, रस्त्यांच्या विविध कामे सुचवताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ना.अशोक चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले की, सातारा जिल्हयाचया पश्चिमभाग सर्वाधिक पर्जन्यमानाचा भाग म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो,महाबळेश्वर, नवजा, कोयना या खो-यात नेहमीच सर्वाधिक पाउस पडत असतो तर सातारा जिल्हयाच्या पूर्वकडील भाग गेल्या कित्येक वर्षापासून अवर्षणग्रस्त म्हणून ओळखला जात आहे. जलसिंचनाकामी जिल्हयातील पश्चिमभागातील ग्रामस्थांनी केलेल्या असिम त्यागामुळे आणि जलसंधारणाच्या कामांमुळे आज गेल्या कित्येक
वर्षातील अवर्षणाची परिस्थिती थोडयाश्या प्रमाणात सुधारत आहे. जागतिक पर्यटन स्थळ म्हणून कास पठाराचा
आणि महाबळेश्वरसह अन्य काही भागाचा समावेश केला गेला आहे.

सातारा जिल्हा हा भौगोलिकदृष्टया देखिल वेगळा आहे. पश्चिमभागातील डोंगरद-यांच्या रांगा तर पूर्वेकडे समतल कोरडा प्रदेश यामुळे सातारा जिल्हयाचा राज्याच्या अंदाजपत्रकाकरीता विचार करताना, विशेष तरतुद केली गेली पाहीजे अशी आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे सातारा ही ऐतिहासिक भुमी आहे, आजी-माजी सैनिकांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्हा ओळखला जातो, तसेच महाराष्ट्रात सर्वांत जास्त वीज निर्मितीचा जिल्हा म्हणूनही सातारा जिल्हयाची वेगळी ओळख आहे. येथील राजकारणामध्येही समाजकारण करण्यावर भर असतो,असे विविधांगी वेगळेपण जपणा-या सातारा जिल्हयावर, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून विशेष लक्ष पुरवावे अशी विनंती ना.अशोक चव्हाण यांना करताना, जिल्हयातील विविध रस्त्यांच्या गतीमान दळणवळणाच्या सुविधेसाठी काही कामांचा राज्याच्या अर्थसंकल्पात समावेश करण्यासाठी सुचविणेत आली आहेत असे सांगीतले.

अशोक चव्हाण यांनी यावेळी राज्याच्या अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम विभागाविषयीच्या बाबींवर सरस निरस मानाने विचार करुन, सातारा जिल्हयातील जास्तीत जास्त रस्ते विकास कामांना, झुकते माप निश्चितपणे दिले जाईल. जास्तीत जास्त निधी दिला जाईल असे आवर्जुन सांगीतले

Adv