साताऱ्यातील शिवगान स्पर्धेने जिंकली महाराष्ट्राची मने स्पर्धा उत्साहात संपन्न

455
Adv

शिवगान स्पर्धेमुळे,शिवरायांच्याशौर्य धर्य,पराक्रम,बुध्दीचातुर्य,स्वयंशिस्त आदी गुणांचा प्रसार होवून, ते अंगिकारण्याची जाणिव जागृती झाली आहे. सुमारे १५ हजार स्पर्धक, स्पर्धेमधील विजेते, स्पर्धकांना प्रोत्साहन
देणारे पालक,मार्गदर्शक आणि स्पर्धा आयोजन करणारे भाजपाचे सांस्कृतिक सेलचे सर्व पदाधिकारी या सर्वांचे
आम्ही ह्दयस्थ अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो. फक्त आम्हीच नाही तर महाराष्ट्रातील शिवरायांना मानणारा
प्रत्येक व्यक्ती हा शिवरायांचा वंशज आहे. आगामी काळात शिवगान स्पर्धा अधिक व्यापक पध्दतीने आयोजित
करण्यात आमचे नेहमीच सहकार्य राहील असे आग्रही मत व्यक्त करतानाच, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे
भोसले यांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज एकमेवाब्दितीय राजे होते,त्यांच्या राज्यशैलीचे अनुकरण केल्यासच,
भारत देश महासत्ता बनेल असा दुर्दम्य आशावाद व्यक्त केला.
भाजपा सास्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शिवगान स्पर्धेच्या बक्षिस समारंभ आणि समारोप प्रसंगी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे माजी मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, सांस्कृतिक सेलचे राज्य संयोजक शैलेश गोजमगुंडे, माजी आमदार सौ.कांताताई नलावडे, भरत पाटील, लक्ष्मण सावजी, उपाध्यक्ष पंकज चव्हाण, यांचेसह भाजपा चे आणि भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठचे सर्व पदाधिकारी, स्पर्धापरिक्षक नंदेश उमप, विसु बापट, सौ.विनिता जोशी, आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय एकात्मिता साध्य होण्यासाठी शिवरायांची नीती आचरणात आणली गेली पाहीजे. अठरा पगड जातींना बरोबर घेवून जात-पात,धर्म,पंथ विरहित आदर्श समाजव्यवस्था शिवाजी महाराज यांनी आपल्याला दिली आहे. सर्वधर्मसमभाव ठेवून,स्वराज्या निर्माण करण्याचे अतुलनीय कार्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. त्यांच्या शब्दकोषात अशक्य हा शब्द नव्हता म्हणून ते उत्तुंग कार्य करु शकले असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी नमुद केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी महसूलमंत्री आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगीतले की, शिवसेनेचे मुख्यमंत्री असलेल्या या आघाडी सरकारने महाराष्ट्रात आजान स्पर्धा आयोजित केली तथापि भाजपाने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुणगान गाणारी शिवगान स्पर्धा आयोजित केली. हिंदूत्वाच्या प्रश्नावर भाजपा आणि शिवसेनेमध्ये हा फरक आहे. हिंदू या शब्दातच सर्वधर्म
समभाव व्यापलेला आहे. हिंदु सहिष्णु आहेत. हिंदू हे मुस्लीमविरोधी नाहीत, जो भारत देशाला मानतो तो मुस्लीम
असो नाहीतर आणखी कुणी असला तरी तो आपलाच आहे, तो भारतीय आहे ही आमची भावना आहे. स्पर्धेला
गडावर परवानगी सरकारने नाकारली तरी सुध्दा आज अजिंक्यता-याच्या पायथ्याशी स्पर्धेचा समारोप होत आहे. या
स्पर्धेच्या समारोपास प्रत्यक्ष छत्रपती शिवाजीमहाराज यांचे वंशज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपण सर्वांनी त्यांचे दर्शन घेतले आहे. स्पर्धेच्या निमित्ताने भाग्याचा क्षण आहे. मी सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो आपल्या प्रास्ताविक भाषणात गोजमगुंडे यांनी सांगीतले की, ही स्पर्धा भाजपाच्या राज्यस्तरीय नेत्यांच्या सहकार्याने आणि आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सक्रीय सहकार्यामुळे होवू शकली.
महाराष्टात ३९ ठिकाणी ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Adv