साताऱ्यातील रस्त्याची उपनगराध्यक्ष शेंडे व माजी अध्यक्ष पाटील यांनी केली पाहणी

414
Adv

सातारा पालिकेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे माजी नगराध्यक्ष निशांत पाटील बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी सदर बाजार व पोवई नाका येथील रस्त्यांच्या कामांची पाहणी केली सदरचे काम उत्कृष्ट करण्याच्या सूचना यावेळी ठेकेदाराला देण्यात आल्या

सातारा पालिकेच्या वतीने सातारा शहरातील विविध रस्त्यांची कामे चालू आहेत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार सर्व कामे ही उत्कृष्ट झाली पाहिजेत अशा सूचना पालिकेला उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या माध्यमातून दिल्या आहेत या सूचनेनुसार उपनगराध्यक्ष शेंडे माजी नगराध्यक्ष निशांत पाटील व बांधकाम सभापती यांनी साताऱ्यातील विविध रस्त्यांची पाहणी केली व सदर कामे ही उत्कृष्टच झाली पाहिजेत अशा सक्त सूचना यावेळी दिल्या

पोवई नाका व सदर बाजार या रस्त्यावर सातारा शहरासह ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांची रोज ये-जा ,या रस्त्यावरून होत असते त्यामुळे कामात हय गम न करता सर्व कामे उत्कृष्ट व जलद व्हावी अशा सूचनाही संबंधित ठेकेदाराला यावेळी देण्यात आल्या

Adv