Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Satara District Satara City अमीर खान रणवीर कपूर आलिया भट यांची सातारच्या जम्बो कोविड सेंटरला मदत

अमीर खान रणवीर कपूर आलिया भट यांची सातारच्या जम्बो कोविड सेंटरला मदत

240
Adv

ऑन स्क्रीन मि परफेक्शनिस्ट ओळखला जाणारा आमीर खान वॉटर कप नंतर पुन्हा एकदा  सातारकरांच्या मदतीला धावला आहे . छत्रपती शिवाजी संग्रहालयात जिल्हा प्रसाशनाने  ने उभारलेल्या जंबो *कोविड* हॉस्पिटल च्या ऑक्सीजन युनिटसाठी आमीर खानने अकरा लाख तर अभिनेत्री आलिया भट व  *रणबीर कपूर*  यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत केली आहे .

सातारा जिल्हयाचे भूमीपुत्र असणारे प्रसिध्द उद्योजक अविनाश भोसले यांच्या अबिल ग्रुपने पंधरा लाख रुपयांचा निधी जंबो कोविड हॉस्पिटलसाठी दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे . बॉलीवूडचे स्टार सेलिब्रिटी व पुण्याच्या अबिल ग्रुपला मदतीची साद घातली ती सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी . सातारा जिल्ह्यात कोविड संक्रमणाची गंभीर स्थिती असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य यंत्रणा मोठया धीराने या आपत्तीचा सामना करत आहे . कुठे बेडची अडचणं तर कधी रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा तर कधी मनुष्यबळाची टंचाई या गोष्टी टाळण्यासाठी साताऱ्यात विक्रमी वेळेत जंबो हॉस्पिटल उभारण्याचे आव्हानं जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारत त्याची जवाबदारी आरोग्य यंत्रणा, PWD तसेच क्रेडाई सातारा या दर्जेदार बांधकाम व स्थापत्य उभारणाऱ्या अनुभवी संस्थेला दिली .सगळ्या शासकीय विभागांनी व क्रेडाई उत्तम  समन्वय साधून अवघ्या एकोण तीस दिवसात छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या वास्तूत *कोविड* हॉस्पिटलची देखणी व्यवस्था उभारली . तब्बल 48 सीसीटीव्हींची यंत्रणा अडीचशे ऑक्सीजन तर बावन्न व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था, प्रशस्त पार्किंग, डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ साठी स्वतंत्र व्यवस्था, तीन बाजूने स्वतंत्र प्रवेश, अद्ययावत एलिवेटर व्यवस्था या अनेक सोयीं आरोग्य यंत्रणा, PWD तसेच क्रेडाई    यांच्यासमवेत जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी स्वतः जातीने उभ्या राहून करवून घेतल्या . जंबो हॉस्पिटलसाठी सर्वात महत्वाचे होते ते तेरा हजार किलो लीटरचे ऑक्सीजन युनिटची उभारणी करणे . या युनिटच्या उभारणीसाठी तब्बल 45 लाख रूपये खर्च अपेक्षित होता . शेखरसिंग यांनी सरकारी मदतीवर अवलंबून न राहता बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटी व उद्योजक मंडळीना मदतीची साद घातली . या आवाहनाला प्रतिसाद देत मि. परफेक्शनिस्ट अशी ओळख असणाऱ्या आमीर खानने या ऑक्सीजन युनिट साठी तब्बल अकरा लाख रूपयांची मदत केली .आमीर खानने वॉटर कप च्या माध्यमातून दुष्काळ निवारणाच्या निमित्ताने येथील मातीशी नाळ बांधली . पंधरा वर्षापूर्वी किरण रावशी लग्नगाठ पाचगणीत बांधणारा आमीर खान अनेक कारणाने सातारा जिल्हयाशी बांधला गेला आहे . याच हक्काने आमीर पुन्हा एकदा सातारकरांसाठी धावला .आमीरखानने स्वतःच नाही बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट व  रणबीर  सिंग यांना मदतीसाठी प्रवृत्त केले . त्या दोघांनीही ऑक्सीजन युनिटसाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत दिली . ऑक्सीजन युनिटची मोठी टाकी ही गुजरात मधील आयनॉक्स या कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे . शेखरसिंग यांनी या बॉलीवूडच्या मदतनिधीत खूप पारदर्शकपणा जपला . या सेलिब्रिटींनी सर्व निधी थेट आयनॉक्स कंपनीच्या खात्यावर वर्ग केला . मूळचे तांबवे येयील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांच्या प्रसिद्ध अबिल ग्रुपने तब्बल पंधरा लाखाची मदत करून आपल्या बांधिलकीचा परिचय दिला . बॉलीवूडच्या या मदत निधीचा जिल्हाधिकारी आणि क्रेडाईच्या सदस्यांनी कामाचे गांभीर्य व जवाबदारी ओळखून कुठेही गवगवा केली नाही . किंबहुना कामावर लक्ष केंद्रित करू या असा दंडक जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः घालून घेतला होता . क्रेडाईच्या सर्व सदस्यांनी शेखर सिंग यांच्या विनंतीला मान देऊन या सर्व बाबी गुलदस्त्यात ठेवल्या .

चौकट

जिल्हाधिकाऱ्यांची चौफेर कामगिरी

कोविड संक्रमण रोखण्यासाठी उभारण्यात आलेल्या जंबो  कोविड हॉस्पिटलच्या  उभारणीत शेखर सिंग यांच्या नेतृत्व गुणांची चुणूक दिसून आली .जंबो हॉस्पिटलच्या प्रत्येक सोयी सुविधा व अडीअडचणी या स्वतः शेखर सिंग यांनी अत्यंत कुशलतेने सोडवत प्रत्येक अडचणीवर मात केली . जिल्ह्यात बऱ्याच वेळा आपत्तीजनक परिस्थिती उद्भवली मात्र या संकटाचाही जिल्हाधिकाऱ्यांनी अभ्यासपूर्ण सामना करताना राजकीय समन्वय सुध्दा उत्तम ठेवला . गेल्या आठ महिन्यापासून शेखर सिंग आणि त्यांची टीम करोनाला हरविण्यासाठी मनापासून काम करते आहे . स्वतः जिल्हाधिकारी कामाच्या बाबतीत प्रचंड उत्साही असल्याने आम्हालाही कामाचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही अशी प्रतिक्रिया क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी दिली .

Adv