माजी विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा आज वाढदिवस फलटण येथे साजरा होत असताना तुतारीचा गजर घुमल्याने माढा लोकसभा मतदारसंघात भल्या भल्यांच्या पुंग्या वाजल्या आहेत
फलटणचे अधिपती माजी विधानपरिषद सभापती श्री रामराजे नाईक निंबाळकर यांचा आज वाढदिवस फलटण येथे मोठ्या दिमाखात साजरा करण्यात होत असताना वाढदिवसाच्या ठिकाणीच कार्यकर्त्यांनी केलेल्या तुतारीच्या नियोजनाने परफेक्ट कार्यक्रम करेक्ट नियोजन असेच येथे उपस्थित असलेले लोक म्हणत होते येणाऱ्या काळात श्री रामराजे नाईक निंबाळकर माढा लोकसभेच्या अनुषंगाने कोणती भूमिका घेतायेत याकडे सर्वांचे लक्ष लागले तर आहेच मात्र आज झालेल्या वाढदिवसाच्या दिवशी तुतारीचाच गजर माढा लोकसभेत घुमला अशी चर्चा माढा मतदारसंघात रंगू लागली आहे
नाईक निंबाळकर कुटुंबाने माढा लोकसभेसाठी शड्डू ठोकलाच आहे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपली भूमिका लवकरच स्पष्ट करावी अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी केली असून वाढदिवसाच्या दिनी घुमलेल्या तुतारीच्या गजराने येणाऱ्या काळात माढा लोकसभा मतदारसंघात काय होणार याची चाहूल लागली असल्याचे दिसून आले