सातारा सैनिक स्कूलची महुर्तमेढ देशाचे तत्कालीन संरक्षण मंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांनी रोवली, या शाळेतील विद्यार्थी सैन्यांमध्ये तसेच इतर क्षेत्रांमध्ये चांगली सेवा बजावत असून याचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. या शाळेच्या विकासासाठी राज्य शासन सर्व ती मदत करेल, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.
येथील सैनिक स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. पाटील यांनी सैनिक स्कूलच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. यानंतर राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी त्यांना मानवंदना दिली. यावेळी सैनिक स्कूलच्या प्राचार्य ग्रुप कॅप्टन मनिषा मिश्रा, उप प्राचार्य विंग कमांडर बी. लक्ष्मीकांत, भगतसिंह पाटील आदी उपस्थित होते.
सातारा सैनिक स्कूल ही आदर्श शाळा आहे, असे सांगून जलसंपदा मंत्री श्री. पाटील म्हणाले, या शाळेचा परिसर स्वच्छ आणि येथील वसतिगृहे सर्व सोयीसुविधांयुक्त आहेत. या शाळेमध्ये महाराष्ट्रातून विद्यार्थी येत असतात या विद्यार्थ्यांना शाळेतन चांगल्या प्रकारे शिक्षण दिले जात असल्याने येथील विद्यार्थ्याचे भविष्य उज्वल असते. या शाळेचा महाराष्ट्रला अभिमान असून या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून सर्व ती मदत केली जाईल, असेही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शेवटी सांगितले.
सैनिक स्कूल शाळेचा विद्यार्थ्यांचा परीक्षेचा निकाल हा 100 टक्के असतो. या शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहे. या शाळेतील विद्यार्थी जास्त करुन एनडीएमध्ये भरती होतात. या शाळेतून युपीएसीचीही अभ्यासाची तयारी करुन घेतली जात असल्याचे सांगून शाळेत झालेल्या विकास कामांची माहितीही प्राचार्य ग्रुप कॅप्टन मनिषा मीश्रा यांनी प्रास्ताविकात सांगितली.
या कार्यक्रमात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. शाळेतील प्रार्थना प्रांगणाच्या नुतनीकरणाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सैनिक स्कूलमधील विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक यावेळी उपस्थित होत