सिम कार्ड असणे गरजेचे आहे. सिम कार्डच्या मदतीनेच कॉल, मेसेज, इंटरनेटचा वापर करणे शक्य होते. मात्र, तुम्ही नवीन सिम कार्ड खरेदी करण्याचा विचार करत असाल अथवा तुमच्या नावावर एकापेक्षा अधिक सिम कार्ड असल्यास सावधiगिरी बाळगण्याची गरज आहे.सिम कार्डसंदर्भातील अनेक नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. यातील काही नियम आधीपासूनच लागू आहेत, तर काही 1 एप्रिल 2025 पासून लागू होतील. हे नियम काय आहेत, त्याविषयी जाणून घेऊयात.
आधार व्हेरिफिकेशन गरजेचेनवीन सिम कार्ड खरेदी करायचे असल्यास आधारच्या माध्यमातून बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे.सिम विक्रेत्यांना पाळावे लागणार नियमसिम कार्ड विक्रीसाठी सरकारने रिटेलर्ससाठी देखील नियम जारी केले आहेत. या नियमांचे पालन करूनच सिम कार्डची विक्री करावी लागेल. रिटेलर्सला ग्राहकांच्या नावावर किती सिम कार्ड कनेक्शन आहेत, याची तपासणी करावी लागेल. ग्राहकाने वेगवेगळ्या नावाने कनेक्शन घेतले असल्यास त्याचीही चौकशी केली जाईल.
तसेच, टेलिकॉम कंपन्यांना त्यांचे एजेंट, फ्रेंचाइजी आणि सिम कार्ड डिस्ट्रिब्यूटर्सची नोंदणी करावी लागेल. नोंदणी न केल्यास 1 एप्रिलपासून सिम कार्डची विक्री करता येणार नाही.
3 वर्षांच्या शिक्षेची तरतूदचुकीची पद्धत अथवा बनावट कागदपत्रांचा वापर करून सिम कार्ड खरेदी केल्यास 50 लाख रुपयांपर्यंत दंड आणि 3 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या नावावर किती सिम कार्ड सुरू आहे, याबाबत माहिती घ्यावी. एका व्यक्तीच्या नावावर केवळ नऊ सिम असू शकतात. यापेक्षा जास्त सिम कार्ड असल्यास दंड आकारला जाईल.
तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे देखील तुम्ही जाणून घेऊ शकता. Sancharsathi.gov.in या वेबसाइटच्या माध्यमातून तुमच्या आधारवर नोंद असलेल्या सर्व सिम कार्डची माहिती मिळेल. तुम्ही वापरत नसलेला नंबर रिपोर्ट करण्याचीही सुविधा या वेबसाइटवर मिळते.