महाबळेश्वर पठार अंजन जातीच्या फुलांनी बहरले

84
Adv

दर दोन वर्षांनी फुलणाऱ्या अंजन या वनस्पतीला सध्या बहर आला असून महाबळेश्वर मधील जंगले अंजन फुलांच्या निळ्या जांभळ्या रंगानी नटलेले असल्याचे सुखद चित्र येथे पहावयास मिळत आहे.महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरमध्ये सध्या उन्हाळी हंगामाची चाहूल सुरू झाली आहे. दिवसभर उन्हाचे चटके तर सकाळ आणि संध्याकाळसह रात्री अत्यंत आल्डादायक असे येथील सुंदर वातावरण आहे.

उन्हाळी हंगाम हा जरी उन्हाळी चटक्यांसाठी प्रसिद्ध असला तरी या हंगामात अनेक रान वनस्पती फुललेल्या पहावयास मिळतात. जांभुळ, गेळा, अंजन, पीसा, पांगळा वनस्पतींसह करवंद, तोरण, अंबुळकी आदी रान मेव्याची वनस्पती असो सर्वांना या काळात फुलांचा बहर व त्यानंतर फळ येत असल्याने हा कालावधी त्यांच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा असतो. निसर्ग जणू याची वाटच पाहत असतो.

Adv